UPI Transaction: UPI मुळे व्यवहार अगदी सोपा झाला आहे. काही सेकंदात मोबाईल फोनच्या माध्यमातून छोटी आणि मोठी रक्कम सहज पाठवता येते. त्यामुळे खिशात जास्त रोकड आजकाल कोणी ठेवत नाही. पण युपीआय ॲपच्या माध्यमातून व्यवहार करताना काळजी घेतली नाही तर अनेकदा अतिरिक्त रक्कम समोरच्या व्यक्तीला जाते. 500 रुपये पाठवण्याऐवजी 5,000 रुपये पाठवले जातात. एका शुन्यामुळे मोठा […]
Archives for June 2026
आठ एपिसोड्सच्या सीरिजचा ओटीटीवर बोलबाला; ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ला पछाडत रातोरात बनली नंबर 1
एका कादंबरीवर आधारित वेब सीरिज सध्या ओटीटीवर अनेकांच्या 'मस्ट वॉच' यादीत समाविष्ट झाली आहे. अवघ्या चार दिवसांत ही नवीन सीरिज अनेक टॉप-रेटेड थ्रिलर सीरिजना पछाडत ट्रेंडिंग यादीत पोहोचली आहे. ही एक लिमिटेड क्राइम ड्रामा सीरिज आहे, ज्याला आयएमडीबीवरही (IMDb) तगडी रेटिंग मिळाली आहे. आठ एपिसोड्सच्या या सीरिजला फक्त परदेशातच नाही तर भारतातही खूप पसंती मिळत […]
Ladaki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! थेट विधानसभेतच निवेदन; तब्बल…
महाराष्ट्र सरकारची गेम चेंजिंग ठरलेली ‘लाडकी बहीण’ योजने सतत चर्चेत असते. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता योजनेच्या अंमलबजावणीत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. योजनेच्या लाभार्थी यादीत १२,४१५ शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. यासोबतच पुरुष लाभार्थीही आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली […]
Rahul Narvekar : ‘लवकरात लवकर मराठी भाषा शिका, अन्यथा त्यांच्या चेहऱ्यावर..’ मनसेचा राहुल नार्वेकरांना इशारा
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या मराठी वाचनामुळे वादात सापडले आहेत. नार्वेकरांना त्यांच्या मराठी उच्चारणावरुन ट्रोल करण्यात येत आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल दुसरा दिवस होता. यावेळी सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका आशा भोसले आणि दीनदयाळ उपाध्याय यांचा शोकप्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर बोलताना राहुल नार्वेकर यांच्याकडून वाचनात चुका झाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण […]
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं…
गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना पेणमधील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या जोरदार लगबग सुरू आहे. बाप्पाच्या आकर्षक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तीकार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मात्र, मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसाने पेण तालुक्यातील कळवा गावातील एका गणेशमूर्ती कारखानदाराचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक कारखान्यात पावसाचे पाणी शिरल्यामुळे शेकडो गणेशमूर्ती पाण्यात भिजल्या. कळवा गावातून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह काही […]
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
मुंबईत कालपासून सुरू झालेल्या पावसाने आज सकाळी जोर धरला आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कुर्ला, सायन आणि आसपासच्या परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. कुर्ला ते चुनाभट्टी मार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. […]