• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आठ एपिसोड्सच्या सीरिजचा ओटीटीवर बोलबाला; ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ला पछाडत रातोरात बनली नंबर 1

June 24, 2026 by admin Leave a Comment


एका कादंबरीवर आधारित वेब सीरिज सध्या ओटीटीवर अनेकांच्या 'मस्ट वॉच' यादीत समाविष्ट झाली आहे. अवघ्या चार दिवसांत ही नवीन सीरिज अनेक टॉप-रेटेड थ्रिलर सीरिजना पछाडत ट्रेंडिंग यादीत पोहोचली आहे. ही एक लिमिटेड क्राइम ड्रामा सीरिज आहे, ज्याला आयएमडीबीवरही (IMDb) तगडी रेटिंग मिळाली आहे.

आठ एपिसोड्सच्या या सीरिजला फक्त परदेशातच नाही तर भारतातही खूप पसंती मिळत आहे. या सीरिजने स्टँडअप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट'च्या दुसऱ्या सिझनलाही मागे टाकलं आहे. या मिनी सीरिजचं नाव 'आय विल फाइंड यू' (I Will Find You) असं आहे. हार्लन कोबेन यांच्या त्याच नावाच्या बेस्ट सेलिंग कादंबरीवर आधारित ही सीरिज आहे.

हार्लन कोबेन या सीरिजचे कार्यकारी निर्मातेसुद्धा आहेत. यामध्ये सॅम वर्थिंग्टन, ब्रिट लोअर, माइलो वेंटिमिग्लिया आणि एरिन रिचरर्ड्स यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजमध्ये एका अशा पित्याची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांच्यावर त्यांच्याच मुलाच्या हत्येचा गंभीर आरोप आहे. मुलाच्या हत्येप्रकरणी पित्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येते.

तुरुंगात असलेल्या पित्याला कुठेतरी वाटत असतं की त्यांचा मुलगा जिवंत आहे. त्यामुळे तुरुंगातून निघताच ते मुलाच्या शोधात जातात. मात्र या खतरनाक प्रवासात त्यांच्यासमोर काही असे रहस्य येतात, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. ही सीरिज 18 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होताच ही वेब सीरिज टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. या वेब सीरिजचने 'टीच यू अ लेसन' आणि 'इंडियाज गॉट लेटंट 2'ला मागे टाकलं आहे. या क्राइम थ्रिलरला आयएमडीबीवर दहापैकी 7.3 रेटिंग मिळाली आहे. या आठ एपिसोड्सच्या मिनी सीरिजचा रन-टाइम एक तासापेक्षाही कमी आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 248 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याने घेतली बागेश्वर बाबांची भेट; जमिनीवर बसून केली चर्चा
  • मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या… पहा व्हिडीओ
  • Jalna Thackeray Sena Protest | 6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक! थेट भीक मागत…
  • ED Raids: मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या मंत्र्यांच्या जावयाच्या घरावर ईडीचे छापे, मोठी खळबळ, सापडले घबाड?
  • Mumbai News : धावत्या ट्रेनमध्ये रक्तरंजित खेळ… मुसळधार पावसात फर्स्टक्लासच्या डब्यात काय घडलं ? प्रवाशाला भोसकणारा तो..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in