• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग

August 26, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रात MPSCचाही पेपर सुरक्षित राहिलेला नाही. कारण 22 मार्चला औषध निरीक्षक पदासाठी ही परीक्षा झाली. निकालही लागला आणि आता पेपर फुटल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे नंदुरबारमधील एका जोडप्याचं ब्रेकअप झालं आणि त्या रागातून MPSCचा पेपर कसा फुटला याचही बिंग फुटलंय. पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC चाही पेपर फुटलाय. त्यामुळे औषध निरीक्षक गट ब पदासाठी झालेली भरतीप्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय MPSC ने घेतलाय. विशेष म्हणजे नंदुरबारच्या जोडप्याचं ब्रेकअप झाल्यामुळे पेपरफुटी समोर आली. २२ मार्चला औषध निरीक्षक पदासाठी पेपर घेण्यात आला. 20 मार्चलाच पेपर फुटल्याचं तपासात समोर आलंय. 154 पदांसाठी तब्बल 44 हजार 500 जणांनी परीक्षा दिली. 12 जूनला निकालही लागलाय आणि 1 ते 22 जुलैच्या दरम्यान मुलाखतीनंतर 488 जणांची गुणवत्ता यादीही लागली. पण पेपरफुटीच्या तक्रारीनंतर तपासात पेपर फुटल्याचं निष्पन्न झालं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेपरफुटी उघड होण्यामागे लव्हस्टोरी असल्याचं समजतंय. नंदुरबारमधील ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्या प्रेमप्रकरणातून पेपरफुटी समोर आली. ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी प्रवीण पाटील या दलालाकडून परीक्षेच्या 2 दिवसाआधी पेपर फोडला. MPSC तील एका कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी जवळीक साधून दलाल प्रवीण पाटीलने पेपर फोडला. ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर आपल्या प्रेमापोटी प्रियकर गौरव पाटीललाही पेपर दिला. ऋतुजा पाटील लेखी परीक्षाही पास झाली आणि मुलाखतीनंतर नोकरीसाठी पात्रही झाली.

मात्र काही दिवसांनी ऋतुजा आणि गौरव पाटील यांच्यात मोठे वाद झाल्याची माहिती आहे. वादानंतर ब्रेकअप झालं आणि ब्रेकअपच्या रागातून गौरव पाटील याने स्वतः ऋतुजा विरोधात MPSC त तक्रार केली. त्यानंतर परत गौरव पाटीलने पुन्हा MPSC त ई-मेल करून मी मुद्दाम पेपरफुटीचा बनाव केला असंही कळवलं. तर रोहित पवारांनी प्रत्येकी 40 लाखांना पेपर विकला गेल्याचा आरोप केलाय. आणि MPSCच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी केलीय. हे जे काही तपास आहेत, एफआयआर आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिक करा, लपवून ठेवू नका. कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपर नाहीतर हे प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटं आहे. अनेक लोकांची नावं आम्ही दिलेली आहेत. एक-एक पेपर हा 40-40 लाख रुपयाला तिथे गेलेला आहे. त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे एम पी एस एम पी एस सी चा पेपर कधीच फुटत नव्हता 1997 नंतर आत्ता तो पहिल्यांदा फुटलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मुलं आता घाबरलेली आहेत. MPSC च्या पेपरफुटीचं नंदुरबार कनेक्शन समोर आलेलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचने ऋतुजाचा एक्स प्रियकर गौरव पाटील, ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील आणि दलाल प्रवीण पाटीलला अटक केली. तर मुख्य लाभार्थी ऋतुजाला नोटीस पाठवण्यात आली. त्यासोबतच MPSCचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे आणि सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे तसंच विश्वेश्वर नकाते यांनाही अटक करण्यात आली. पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर MPSC नेही पोलिसात तक्रार केली होती. ज्यात MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकरांनी म्हटलं होतं, की पेपरफुटीची तक्रार गौरव पाटील आणि ऋषिकेश गांगर्डे यांनी केली. पण गौरव पाटीलने पुन्हा ईमेल पाठवून म्हटलं की आयोगाची प्रश्नपत्रिकाच फुटलेली नाही.

व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका ही आयोगाचीच असल्याचं सांगितलं. ऋषिकेश गांगर्डे स्वतः परीक्षेत नापास झाला असून पुन्हा पेपर घेण्यात यावा यासाठी पेपर फुटल्याची अफवा पसरवली. मात्र आता त्याच ऋषिकेश गांगर्डेने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना सवाल करत पेपरफुटीचे आणखी किती लाभार्थी आहेत याचाही खुलासा करणार असा इशारा दिलाय. MPSC ने जो ड्रग इंस्पेक्टर परीक्षेत घोटाळा झाला होता तो मान्य केला आहे. रि-एक्झाम केलेली आहे. पण सुरुवातीला त्यांनी मान्य केली नव्हती. तक्रार आली नाही, मी स्वतः जाऊन तक्रार दिलेली होती. उलटं माझ्यावरच डिफिमेशनचा गुन्हा दाखल करणार म्हणून MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांनी स्टेटमेंट दिले होते. नोटिफिकेशन काढले होते. हा पूर्ण अहवाल आम्हाला पूर्ण मान्य नाही. त्यातल्या काही गोष्टी मान्य आहेत. पण त्यात लिहिलंय की एकाच जणाकडे क्वेश्चन मिळाला होता, तो मान्य नाहीये. ते सविस्तर मी पत्रकार परिषदेत तिथे सांगणार आहे. MPSC चे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरीसपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं. पुणे छात्रू की गूंज कार्यक्रमातही शरयू चोपडे नावाच्या विद्यार्थिनीने MPSC च्या पेपरफुटीची माहिती दिली होती. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा मोठा विजय. MPSC ची ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा आणि संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द झाली. ही सरकारची मेहरबानी नाही, तर त्या विद्यार्थ्यांचा विजय आहे. जे पेपरफुटीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. दबाव सहन केला, टोमणे ऐकले. पण आवाज बंद केला नाही, मला तुमचा अभिमान आहे. पण जोपर्यंत पेपर लीक करणाऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा अपूर्ण आहे. पुढे अजून बरेच लढायचं आहे आणि प्रत्येक लढ्यात मी तुमच्या पाठीशी आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in