• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

500 ऐवजी पाठवले 5,000 रुपये? एका शुन्याने केला घोटाळा? मग जास्त पैसे कसे मिळणार परत? प्रक्रिया जाणून घ्या

June 24, 2026 by admin Leave a Comment


UPI Transaction: UPI मुळे व्यवहार अगदी सोपा झाला आहे. काही सेकंदात मोबाईल फोनच्या माध्यमातून छोटी आणि मोठी रक्कम सहज पाठवता येते. त्यामुळे खिशात जास्त रोकड आजकाल कोणी ठेवत नाही. पण युपीआय ॲपच्या माध्यमातून व्यवहार करताना काळजी घेतली नाही तर अनेकदा अतिरिक्त रक्कम समोरच्या व्यक्तीला जाते. 500 रुपये पाठवण्याऐवजी 5,000 रुपये पाठवले जातात. एका शुन्यामुळे मोठा घोटाळा होतो. अशावेळी अतिरिक्त पाठवलेले पैसे कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. समोरची व्यक्ती ओळखीची असेल तर पैसे परत मिळतात. पण ओळख नसलेल्या व्यक्तीकडे पैसे पाठवल्यास हा प्रश्न निर्माण होतो.

अतिरिक्त रक्कम पाठवल्यास काय कराल?

UPI च्या माध्यमातून अतिरिक्त रक्कम पाठवल्यास आणि ते तात्काळ तुमच्या लक्षात आल्यास समोरच्या व्यक्तीला ती रक्कम परत करण्याची विनंती करा. पण जर गडबडीत तुम्ही अतिरिक्त रक्कम पाठवली आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात ही बाब आली तर मग घाबरू नका, अशा स्थितीतही तुम्हाला रक्कम परत मिळू शकते. त्यासाठी काही पावलं टाकावी लागतील.

चुकून ज्या व्यक्तीला, दुकानदाराला, संस्थेला तुम्ही अतिरिक्त रक्कम पाठवली. तिच्याशी तातडीने संपर्क साधा. अतिरिक्त रक्कम पाठवल्याचे रिसिप्ट त्याला शेअर करा. त्याला अतिरिक्त रक्कम तातडीने परत करण्याची मागणी करा. अनेक प्रकरणात समोरील व्यक्ती सुद्धा अतिरिक्त जमा झालेली रक्कम परत करते. शक्यतोवर कोणी रक्कम परत करण्यास टाळाटाळ करत नाहीत.

जर समोरील व्यक्ती अतिरिक्त रक्कम देण्यास टाळाटाळ करत असेल तर मग संबंधित बँकेकडे, युपीआय ॲपवर तक्रार नोंदवा. तक्रार करताना तो युपीआय व्यवहाराचा आयडी, व्यवहाराचा स्क्रीनशॉट अथवा ती रिसिप्ट, इतर महत्त्वाची माहिती शेअर करा. अशा वादाच्या वेळी हे डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरतात. तुमची बाजू भक्कम होते.

बँक आणि युपीआयकडे तक्रार

एकदा पेमेंट झाले की ते लागलीच रद्द करता येत नाही अथवा ते रिव्हर्स होत नाही. अशावेळी कोणताही व्यवहार करताना गडबड करू नका. किती रक्कम द्यायची आहे हे एकदा कन्फर्म करा. रक्कम निश्चित झाली की तिची खातरजमा करा आणि नंतरच व्यवहार करा. जर समोरच्या व्यक्तीने रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली तर मग संबंधित बँक आणि युपीआय ॲपवर तक्रार नोंदविता येते. या दोन्ही संस्था तुम्हाला वाद मिटवण्यात आणि रक्कम परत करण्यास मदत करेल. जर समोरील व्यक्ती अतिरिक्त रक्कम जमा झाल्याचे मान्य करून ती परत करत असेल तर वाद वाढत नाही.

पण जर समोरील व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला तर काय करता येईल? अशावेळी कायदेशीर कारवाईचा उपाय हा तुमची रक्कम किती जास्त होती यावर अवलंबून आहे. पण अनेक प्रकरणात युपीआय ॲपद्वारे अथवा बँकेद्वारे मोठी मदत मिळू शकते. तुम्ही सदर व्यक्तीवर मध्यस्थीच्या मार्फत पैसे परत करण्याची विनंती करू शकता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in