• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

August 26, 2026 by admin Leave a Comment


कॉक्रोच जनता पार्टीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांच्यावर एका मुलाखतीदरम्यान मांजरीने हल्ला चढवला. पाळीव मांजरीने रांका यांच्या हातावर पंजा मारला. पंजा जोरात मारल्याने त्यांना इजा झाली. त्यांच्या बोटातून रक्त बाहेर आले. पाळीव मांजरीने एकाएक हल्ला केल्याने त्यांना काही सुचलं नाही. सीजेपी नेत्यावर यापूर्वी नुकताच राजस्थानमध्ये एका शाळेची पाहणी करण्यासाठी जात असताना हल्ला करण्यात आला होता. त्यावरून राजकारण तापले होते. सध्या सीजेपी देशभरात स्कूल ठीक करो, म्हणजे शाळा सुधारणा अभियान राबवत आहे. त्यातूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

पाळीव मांजरीने केला हल्ला

आशुतोष रांका एका युट्यूब चॅनलला मुलाखत देण्यासाठी पोहचले होते. तिथे त्यांच्यावर अचानक एका पाळीव मांजरीने हल्ला केला. मांजरीने पंजा मारल्याने त्यांच्या एका बोटातून रक्त बाहेर आले. रांका हे राजस्थानमध्ये तिसऱ्या आघाडीवर भाष्य करत होते. या मुलाखतीदरम्यान त्यांनी राजस्थानमध्ये भाजपविना आणि काँग्रेसविना सरकार येण्याची शक्यता वर्तवली. तेव्हा अचानक पत्रकाराच्या स्टुडिओत असलेल्या मांजरीने त्यांच्या हातावर हल्ला केला.

रांका या घटनेने हादरले. त्यांनी लागलीच त्यांचे बोट तोंडात धरले. त्यातून रक्त वाहत होते. मांजरीने त्यावरच हल्ला चढवला होता. काही वेळानंतर मांजर पुन्हा एकदा त्यांच्या जवळ आली. तेव्हा ते अलर्ट झाले. त्यांनी मांजरीला दूर नेण्याची विनंती केली. आता अजून दुसरा ओरखडा मला सहन होणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. बोटाची आग होत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर या मांजरीला बाहेर नेण्यात आले.

राजस्थानमध्ये शाळा दुरुस्ती मोहिम

आशुतोष रांका हे सीजेपीच्या प्रमुख तीन नेत्यांपैकी एक आहेत. ते सध्या राजस्थानमध्ये शाळा दुरुस्ती मोहिम राबवत आहे. त्यांना या महिन्यात छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीनंतर सहसंयोजक करण्यात आले. आशुतोष रांका हे एक फरडे वक्ते आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक मुलाखतीत पक्षाची भूमिका हिरारीने मांडली. आताही ते पक्षाची बाजू उचलून धरतात.

या मोहिमेदरम्यान जयपूर जवळ 40 किलोमीटर दूर रामपूरा या गावात रांका हे साथीदारांसह पोहचले. तिथल्या शाळेची पाहणी ते करणार होते. एका म्हशीच्या गोठ्यात शाळा भरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी गावातील काही लोकांना त्यांच्यासह साथीदारांवर हल्ला केला. गावगुंडांनी त्यांना मारहाण केली. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांच्या कार्यकर्त्यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप रांका यांनी केला. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा सीजेपीने मागितला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in