
भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना कोलंबोत सुरू आहे. चार दिवसांचा खेळ संपला असून श्रीलंकेने भारताने दिलेला फॉलोऑन टाळला आहे आणि अतिरिक्त धावा करून 6 गडी गमावले आहेत. असं असताना या श्रीलंकेच्या दोन्ही डावात पासिंदु सूर्याबंदाराने लक्ष वेधून घेतलं. पण दोन्ही डावात कमनशिबी ठरला. (Photo: PTI)
पासिंदु सूर्याबंदाराने पहिल्या डावात 133 चेंडूंचा सामना केला आणि 80 धावा केल्या. तर फॉलोऑन मिळाल्यानंतर पुन्हा एकदा त्याची बॅट तळपली. तेव्हा त्याने 173 चेंडूत 92 धावांची खेळी केली. पण दोन्ही वेळेस त्याचं शतकं थोडक्यासाठी हुकलं. पहिल्या डावात रवींद्र जडेजा आणि दुसऱ्या डावात मानव सुथारने त्याची विकेट काढली. (Photo: PTI)
एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतकाच्या अगदी जवळ पोहोचून बाद होणारा श्रीलंकेचा पहिलाच युवा फलंदाज ठरला आहे.पासिंदुने याच मालिकेतील पहिल्या सामन्यात 'कन्कशन सबस्टिट्युट' म्हणून पदार्पण केले होते. तेव्हा पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर जोरदार कमबॅक केलं. (Photo: PTI)
1993 साली कोलंबो कसोटी सामन्यात अरविंद डिसिल्वा शतकाला मुकला होता. तेव्हा 93 धावांवर बाद झाला होता. आता असाच प्रकार पासिंदु सूर्याबंदारासोबत घडला आहे. (Photo: PTI)
श्रीलंकेचा रॉय डियास भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यात दोनदा नर्व्हस नाइंटीजचा बळी ठरला होता. याशिवाय रवि रत्नायके, मार्वन अटापट्टू, अँजेलो मॅथ्यूज, दिमुथ करूणारत्ने यांच्यासोबतही असंच घडलं आहे. (Photo: PTI)




Leave a Reply