• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?

August 26, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवायाची राज्यभरात चर्चा असून अनेकांचं धाबं दणाणलं आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी एफडीएकडून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) , अजय देवगण (Ajay Devgn) आणि टायगर श्रॉफ यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. या तिघांनी मिळून केलेल्या ‘विमल इलायची’ची जाहिरात केली होती, त्याचसंदर्भात ही नोटीस असून या तिघांनाही कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख कान पुन्हा चर्चेच आला होता. याच प्रकरणी आता अन्न व औषध प्रशासनाचे कमिश्नर तुकाराम मुंढे (Tukram Mundhe) यांनी मौन सोडलं असून या नोटीशीवर शाहरुखचा काय रिप्लाय आला तेही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले तुकाराम मुंढे ?

टायगर श्रॉफ, अजय देवगण आणि शाहरुख या तिघआंना एफडीने नोटीस पाठवली. यावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की, सेलिब्रिटींना पाठवलेल्या नोटिसा सरोगेट जाहिरातींशी संबंधित आहेत. त्यांच्या मते, एखाद्या उत्पादनाची जाहिरात करताना त्याबद्दल केले जाणारे दावे खरे आणि अचूक असणं गरजेचं आहे. हे नियम नव्याने तयार केलेले नाहीत. ते 2018 मध्ये खाद्य क्षेत्रासाठी लागू करण्यात आले आणि 2019 पासून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली.
जाहिरातींमधून ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे.

शाहरुखचा रिप्लाय काय ?

मात्र या नोटीशीवर अभिनेता शाहरुख खानने अद्याप काहीही रिप्लाय आलेला नाही. शाहरुख खानकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं मुंढे यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यामुळे आता यावर एफडीएकडून काय भूमिका घेण्यात येते, काही कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्र FDAने विमल इलायचीच्या जाहिरातीची गंभीर दखल घेत तिच्या स्वरूपाबाबत चौकशी सुरू केली आहे. ‘विमल’ हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडला जात असल्याने, त्याच नावाने करण्यात येणाऱ्या इलायचीच्या जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात पान मसाल्याच्या ब्रँडची अप्रत्यक्षपणे आठवण निर्माण होऊ शकते, असा FDAचा युक्तिवाद होता. त्यामुळे ही जाहिरात सरोगेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरात ठरते का, याची चौकशी FDAकडून सुरू करण्यात आली.

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…
  • तुकाराम मुंढेंचं सर्वात मोठं पाऊल, आता सणासुदीच्या मिठाईवर…नवे नियम कोणते, काय बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in