गर्मीच्या तडाख्यात घाम येणे ही अगदी सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे आवश्यक असले तरी, जास्त घाम आणि त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी ही अनेकांसाठी अस्वस्थ करणारी समस्या ठरते. यामुळे दिवसभर अस्वस्थता, आत्मविश्वासात घट आणि सामाजिक परिस्थितीत संकोच निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सौंदर्यतज्ज्ञ आणि हर्बल स्किनकेअर एक्सपर्ट शहनाज हुसेन यांनी काही सोपे, […]
Archives for May 2026
आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत… जरांगे पाटलांचं आमरण उपोषणाबाबत कठोर विधान
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी त्यांनी अत्यंत कठोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यावेळी जरांगे म्हणाले, “आपण सरकारला पाहिजे होता, त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. उद्याच्या 29 मे रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो. त्याच […]
Vaibhav Sooryavanshi : फक्त 29 चेंडूत हैदराबादची सर्व स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या वैभवच्या तोंडातून शिवी निघाली का? VIDEO
सनरायजर्स हैदराबादच्या टीमने यंदाच्या सीजनमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. पण आयपीएल 2026 मधील एलिमिनेटरच्या एका सामन्याने त्यांची सर्व स्वप्न धुळीस मिळवली. राजस्थान रॉयल्सने काल झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवला. युवा स्टार वैभव सूर्यवंशी राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. 15 वर्षाच्या या मुलाने तुफानी खेळ दाखवला. त्याच्यामुळे राजस्थानला विशाल धावसंख्या उभारता आली. पण तो बाद झाल्यानंतर […]
टेन्शन वाढणार… आता पेट्रोल 170 रुपये, डिझेल 150 रुपये होणार, बड्या नेत्याचं भाकीत!
गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात इंधन दरवाढ होत आहे. रोजच सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे दर वाढत असले तरी राज्याच्या अनेक भागात इंधन मिळत नाहीये. राज्यातील अनेक पेट्रोलपंप इंधना अभावी बंद झाले आहेत. अनेक पेट्रोल पंपांनी तर पेट्रोल संपलं… डिझेल संपल्याचे बोर्ड लावले आहेत. […]
आकाशला डेट करतेय का? रिंकू राजगुरूने सोडलं मौन, लग्नाबद्दल म्हणाली..
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची जोडी प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाली. आर्ची आणि परश्या यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर हिट ठरलीच, पण ऑफस्क्रीनसुद्धा रिंकू आणि आकाशची जोडी चाहत्यांना खूप आवडते. ‘सैराट’नंतरही हे दोघं एकमेकांच्या संपर्कात असून विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्र पाहिलं जातं. तर सोशल मीडियावरही दोघं एकमेकांसोबतचे फोटो शेअर […]
भारतात धावणार हायड्रोजन रेल्वे, रेल्वे विभागाने दिली थेट मंजुरी; अशी असेल रेल्वे!
Hydrogen Railway : भारताच्या रेल्वे विभागाकडून रेल्वे सेवा नेमकी कशी सुरळीत राहील, यासाठी नेहमी वेगवेगळे प्रयोग केले जातात. रेल्वेची सेवा अत्याधुनिक, सुरक्षित असावी याकडे रेल्वे विभागाचे कटाक्षाने लक्ष असते. गेल्या काही वर्षात रेल्वे मंत्रालय तसेच रेल्वे विभागाने रेल्वेचा वेग कसा वाढेल, तसेच वेगवेगळ्या रेल्वे सामान्यांच्या सेवेत कशा दाखल करता येतील, यासाठी चांगले प्रयत्न झालेले आहेत. […]