• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आकाशला डेट करतेय का? रिंकू राजगुरूने सोडलं मौन, लग्नाबद्दल म्हणाली..

May 28, 2026 by admin Leave a Comment


नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची जोडी प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय झाली. आर्ची आणि परश्या यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर हिट ठरलीच, पण ऑफस्क्रीनसुद्धा रिंकू आणि आकाशची जोडी चाहत्यांना खूप आवडते. ‘सैराट’नंतरही हे दोघं एकमेकांच्या संपर्कात असून विविध कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्र पाहिलं जातं. तर सोशल मीडियावरही दोघं एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. अशातच एका युजरने रिंकूला आकाशसोबतच्या तिच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर रिंकूनेही मनमोकळं उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे रिंकून चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली होती. तिची हीच उत्तरं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका युजरने रिंकूला विचारलं, ‘आकाश आणि तू रिलेशनशिपमध्ये आहात का?’ त्यावर रिंकू म्हणाली, ‘नाही, आम्ही चांगले मित्र आहोत’. त्यानंतर आणखी एकाने सवाल केला, ‘लग्नाबद्दल काय विचार आहे?’ रिंकूने या प्रश्नावर गमतीशीर अंदाजात उत्तर दिलं. ‘चांगला विचार आहे’ असं म्हणत तिने हसण्याचा इमोजी पोस्ट केला. ‘सैराट या चित्रपटाने तुला किती पैसे दिले’, असाही  प्रश्न आणखी एका युजरने विचारला. तेव्हा रिंकूने लिहिलं, ‘सैराटने मला एक ओळख दिली’.

रिंकूने दिलेली उत्तरं-

रिंकूला तिच्या मित्रमैत्रिणींबद्दलही नेटकऱ्यांनी प्रश्न विचारले. ‘तुझी सगळ्यात चांगली मैत्रीण कोण आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये’, या प्रश्नावर रिंकूने सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये तिची कोणीच मैत्रीण नाही पण खऱ्या आयुष्यात पूजा वरद आहे. नेटकऱ्यांनी तिला तिच्या आवडत्या पदार्थाविषयी, आवडत्या ठिकाणाविषयीही बरेच प्रश्न विचारले.

रिंकू आणि आकाशच्या ‘सैराट’ या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला ‘याड’ लावलं होतं. यामध्ये रिंकून आर्चीची आणि आकाशने परश्याची भूमिका साकारली होती. ‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे झाली तरी आजही तो प्रेक्षकांच्या सर्वांत आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. यामधील आर्ची आणि परश्या आता मोठे झाले असून आजही जेव्हा हे दोघं एकत्र येतात, तेव्हा कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडतो. काही दिवसांपूर्वीच रिंकू आणि आकाश एका कार्यक्रमानिमित्त एकत्र दिसले. यावेळी रिंकूने गुलाबी रंगाचा सुंदर सूट परिधान केला होता. तर आकाश टी-शर्ट आणि जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसून आला. या दोघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी एकत्र पोझ दिले होते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in