
महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरुन धुसफूस सुरु होती. आता महायुती समन्वय समितीच्या बैठकीत महायुतीतील अंतर्गत वादावर सखोल चर्चा होऊन तोडगा निघाल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीत रखडलेली महामंडळ आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महायुतीत तंडबखेडे होणार नाहीत अशी आशा व्यक्त केली जात आहे. काय नेमका तोडगा निघाला हे वाचा…
महायुती सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात निधी वाटपावरुन कायम धुसफूस सुरु असते. आता यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वरून महायुतीतील पक्षात मतभेद उद्धभवतील तिकडे आयुक्तांन मार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तरीही मतभेद मिटले नाही तरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सोडवण्यात येईल. अन्यथा समन्वय समितीच्या पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आला आहे.
महामंडळासाठी अजून एक ते दोन बैठका होण्याची शक्यता
पुढील 15 दिवसात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. तर वारंवार सूचना देऊनही स्थानिक स्तरावर महायुतीत धुसफूस असल्याने स्वतः मुख्यमंत्री यांनी सर्व नेत्यांना सूचना केल्या आहेत.
Leave a Reply