• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi : फक्त 29 चेंडूत हैदराबादची सर्व स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या वैभवच्या तोंडातून शिवी निघाली का? VIDEO

May 28, 2026 by admin Leave a Comment

सनरायजर्स हैदराबादच्या टीमने यंदाच्या सीजनमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. पण आयपीएल 2026 मधील एलिमिनेटरच्या एका सामन्याने त्यांची सर्व स्वप्न धुळीस मिळवली. राजस्थान रॉयल्सने काल झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवला. युवा स्टार वैभव सूर्यवंशी राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. 15 वर्षाच्या या मुलाने तुफानी खेळ दाखवला. त्याच्यामुळे राजस्थानला विशाल धावसंख्या उभारता आली. पण तो बाद झाल्यानंतर त्याची निराशा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. वैभवने अवघ्या 29 चेंडूत 97 धावा तडकावल्या. यात 12 सिक्स आणि पाच फोरचा समावेश आहे. त्याच्या या इनिंगच्या बळावर राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादला 47 धावांनी पराभूत केलं. राजस्थान टीमने क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे.

या मॅचमध्ये बाद होऊन पॅवेलियनच्या दिशेने परतत असताना वैभव सूर्यवंशीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. या दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वैभव स्वत:शी बोलताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि निराशा स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर युजर्समध्ये वाद सुरु झाला आहे. काही युजर्सचं म्हणणं आहे की, वैभव रागाच्या भरात स्वत:ला शिवी देतोय. या व्हिडिओचा ऑडियो नाहीय. त्यामुळे काही फॅन्सच्या मते तो शिवी देत नाहीय.

वैभवच एकदम उलट आहे

वैभव सूर्यवंशी संपूर्ण सीजनमध्ये जबरदस्त परफॉर्म करतोय. या मॅचमध्ये सुद्धा त्याने आपली क्षमता दाखवून दिली. नॉकआऊट मॅचमध्ये खेळाडूंवर दबाव असतो. पण वैभवच एकदम उलट आहे. या मॅचमध्ये तो खूप आक्रमक दिसला. त्याने 334.48 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. या दरम्यान त्याने फक्त 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमधील संयुक्तरित्या हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

Every single person is on their feet as the 15-year-old walks off 🫡

Updates ▶ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/mpT3LAIEp0

— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026

पुढच्या सामन्यात अजून 20 धावा आणि एक मोठा रेकॉर्ड

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत 680 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सर्वात पुढे आहे. क्वालिफायर-2 च्या सामन्यातही त्याची नजर एका मोठ्या रेकॉर्डवर असेल. त्याने पुढच्या सामन्यात अजून 20 धावा केल्या तर तो आयपीएल सीजनमध्ये 700 धावा करणारा तो पहिला अनकॅप्ड प्लेयर बनेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
  • अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा
  • IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
  • महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित
  • शर्वरी वाघच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,ग्लॅंमरस फोटो पाहून म्हणाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in