
एक काळ असा होता जेव्हा गोविंदा त्याच्या सिनेमांमुळे आणि भन्नाट डान्समुळे चर्चेत असायचा. पण आता अभिनेता सिनेमांमुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता पत्नी सुनीता आहुजा हिच्यासोबत बिनसलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, सुनीताने अभिनेत्यावर गंभीर आरोप करत गोविंदा याच्यासारखा नवरा नकोच… असं म्हणालेली. तिने घटस्फोटासाठी अर्ज देखील दाखल केलेला, जो आता मागे घेतला आहे. दरम्यान दोघांच्या नात्यावर घरातल्याच सदस्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, नुकताच, अभिनेता कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांनी विमानतळावर स्पॉट केलं.
विमानतळावर पापाराझींनीा घेरलं असता, कृष्णा म्हणाला, ‘लाईव्ह शो असल्यामुळे आम्ही उदयपूरला जात आहोत. मस्ती करण्यासाठी जात आहोत, त्यामुळे मामा संबंधी प्रश्न बिलकूल विचारु नका. मी बाकी सर्वांना पाहिलं आहे, आमच्या घरातील चर्चा करत लोक फुटेज खात आहेत…’, यानंतर एक पापाराझी कृष्णाला म्हणाला, ‘घरातली गोष्ट घरातच राहिलं पाहिजे…’
कृष्णा होकार देत म्हणाला, ‘घरातली गोष्ट घरातच राहिली पाहिजे. इतर लोक यावर चर्चा करतात जे मला बिलकूल आवडत नाही. ते आमचे मामा आहेत. मी तर कधीच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोललो नाही आणि बोलणार देखील नाही. मी माझ्या मामी – मामावर प्रचंड प्रेम करतो. मी देवाला प्रार्थना करतो की, सर्वकाही लवकरात लवकर सुरळीत झालं पाहिजे.’
आरती सिंह मामा – मामीच्या नात्यावर काय म्हणालेली?
आरती सिंह म्हणालेली, ‘मी आधी सुद्धा सांगितलं होतं की, मोठ्यांमध्ये मी कधीच बोलत नाही. ज्यांना फुटेज हवी आहे, ते चांगल्या प्रकारे फुटेज घेत आहेत. त्यामध्ये मी नाही. कारण आम्ही एक कुटुंब आहोत…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
पत्नी सुनीता आहुजा हिच्या आरोपांवर काय म्हणाला अभिनेता?
गोविंदा म्हणालेला, यश मिळवण्यासाठी आपल्या लोकांना वाईट करणं गरजेचं आहे? सुनिता असं करत आहे दुसऱ्याला वाईट ठरवणं थोडं सोपं असतं. ती माझ्याबद्दल चार गोष्टी चांगल्या सांगते आणि एक गोष्ट वाईट सांगते… तर त्यामध्ये प्रेम मला तिचं दिसून येत…’, सांगायचं झालं तर, गोविंदा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गोविंदा याचे ‘रुपा’ आणि ‘दुनियादारी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply