
मुंबईतील माझगाव येथे मोरिया गणपतीच्या आगमन सोहळ्यादरम्यान गोंधळ झाल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिरवणुकीदरम्यान एका सोसायटीतून अंडी फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे, ज्यामुळे परिसरात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर माझगाव परिसरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केले. त्यांनी तात्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
सध्या माझगाव परिसरात शांततापूर्ण वातावरण असून, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असे विधान राणेंनी या घटनेबाबत केले आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. घटनास्थळाजवळील तीन ते चार मोठ्या इमारतींपैकी नेमक्या कोणत्या इमारतीतून अंडी फेकण्यात आली, हे अद्याप पोलिसांना स्पष्ट झालेले नाही. गणेश मंडळ एका विशिष्ट इमारतीवर संशय व्यक्त करत असले, तरी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत आणि पुरावे गोळा करत आहेत.
Leave a Reply