• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री

August 24, 2026 by admin Leave a Comment


श्रीमंतांचा पैसा सध्या कुठे गुंतवला जातोय, याचे उत्तर मुंबईतील रिअल इस्टेट बाजाराने दिले आहे. मुंबईतील टॉप 10 लक्झरी गृहप्रकल्पांमध्ये एकूण 3,815 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे. उच्चभ्रू वर्गाची वाढती आर्थिक ताकद आणि प्रीमियम जीवनशैलीची वाढती क्रेझ यामुळे मुंबई हे देशातील लक्झरी घरांचे सर्वात मोठे हब बनले आहे.

मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये श्रीमंत खरेदीदारांच्या आवडीनिवडी आणि गुंतवणुकीचे पॅटर्न झपाट्याने बदलत असल्याचे दिसत आहे. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत मुंबईतील अवघ्या 10 प्रमुख लक्झरी गृहप्रकल्पांमध्ये तब्बल 3,815 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे.

147 कोटी रुपयांसारखे रेकॉर्डब्रेक सौदे

या बाजारपेठेत एका बाजूला 147 कोटी रुपयांसारखे रेकॉर्डब्रेक मोठे सौदे होत आहेत, तर दुसरीकडे 5 ते 10 कोटी रुपयांच्या घरांची विक्री कमालीची वाढली असून लक्झरी हाउसिंगचा पाया आता उपनगरांपर्यंत विस्तारत आहे.

उपनगरांमध्ये पोहोचली लक्झरी घरांची मागणी

मुंबईतील लक्झरी घरांचा भूगोल आता दक्षिण आणि मध्य मुंबईच्या (उदा. वरळी, मलबार हिल, प्रभादेवी) पारंपारिक सीमा ओलांडून पुढे गेला आहे. गोरेगाव ईस्ट, बोरीवली ईस्ट आणि कांदिवली ईस्ट यांसारख्या उपनगरीय पुनर्विकास कॉरिडॉरमध्ये आता 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रीमियम घरांची विक्री लक्षणीय वाढली आहे.

मेट्रो नेटवर्कमुळे श्रीमंत उपनगरांकडे

आधुनिक गेटेड कम्युनिटीज, आलिशान सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि वाढत्या मेट्रो नेटवर्कमुळे श्रीमंत ग्राहकांची पावले आता उपनगरांकडे वळत आहेत. केवळ वरळी या एकाच मायक्रो-मार्केटमध्ये या तिमाहीत 2,272 कोटी रुपयांचे 97 लक्झरी व्यवहार नोंदवले गेले, जिथे सरासरी तिकीट साईज 23.4 कोटी रुपये होती.

5 ते 10 कोटींचे सेगमेंट सर्वात पुढे

रिअल इस्टेट डेटा फर्म ‘लाइटहाऊस प्रॉपटेक’ आणि ‘झॅपकी’ यांच्या रिपोर्टनुसार, मुंबईच्या बाजारात सध्या सर्वात वेगवान इंजिन ठरत आहे ते 5 ते 10 कोटी रुपयांचे गृहनिर्माण सेगमेंट. या श्रेणीत मध्यवर्ती कुटुंबांकडून आणि व्यावसायिक घटकांकडून सर्वाधिक खरेदी होत आहे.

‘अल्ट्रा-हाय-तिकीट’ घरांच्या विक्रीत संथपणा

50 कोटी रुपयांपेक्षा महाग असलेल्या ‘अल्ट्रा-हाय-तिकीट’ घरांच्या विक्रीत जून महिन्यामध्ये काहीसा ठहराव किंवा संथपणा पाहायला मिळाला आहे. शेअर बाजारातील काहीशी अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे अति-श्रीमंत खरेदीदार सध्या वेट-अँड-वॉच भूमिकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘गोदरेज ट्रायोलॉजी’चा 799 कोटींचा व्यवसाय

या तिमाहीत मुंबईतील उच्चभ्रू वर्गाने सर्वात जास्त पसंती दिली ती वरळी येथील ‘गोदरेज ट्रायोलॉजी सीफ्रंट’ या प्रकल्पाला. ‘आजतक’च्या वृत्तानुसार, या एकाच प्रकल्पात तब्बल 799 कोटी रुपयांच्या 37 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. येथील एका घराची सरासरी किंमत सुमारे 21.6 कोटी रुपये इतकी आहे.

या पाठोपाठ ‘ओबेरॉय एलिसियन’ प्रकल्पाने 488 कोटी रुपयांची (35 व्यवहार) आणि ’25 डाऊनटाउन’ प्रकल्पाने अवघ्या 16 व्यवहारांमधून 452 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे.

बाजार कोणत्या दिशेने जाईल?

‘इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रिएल्टी’ च्या रिपोर्टनुसार, 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत 10 कोटींपेक्षा महागड्या घरांची एकूण विक्री 18,512 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जो मुंबईच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे.

वार्षिक 5 ते 8 टक्क्यांची वाढ अपेक्षित

आगामी काळात मुंबईतील घरांच्या किमतीत वार्षिक 5 ते 8 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तज्ज्ञांच्या मते, जरी जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे काही प्रमाणात वाढीचा वेग संथ होऊ शकतो, तरीही अनिवासी भारतीय (NRI), उद्योगपती आणि उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकारी यांच्याकडून असलेल्या मागणीमुळे मुंबईचे रिअल इस्टेट मार्केट देशात सर्वोच्च स्थानी राहील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट
  • माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in