नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. रात्रीतूनच पाण्याचा प्रवाह आणि पाणी पातळी वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंड परिसरात पूरस्थितीमुळे नेपाळचे दोन पर्यटक अडकले. रामकुंड परिसरातील गांधी ज्योतच्या खाली हे तरूण अडकले होते. रात्री […]
Archives for July 2026
Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त
नीट पेपरफुटीप्रकरणी संपूर्ण देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतरमंतर याठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र त्यांचं कार्य नेहमीप्रमाणे पार पाडताना दिसत आहेत. बुधवारी त्यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील शिक्षणमंत्र्यांच्या मेळाव्यात मोठं भाषण […]
पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना
दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 18 जुलैपासून जमावबंदी लागू केली आहे. आदेशाच्या उल्लंघनाप्रकरणी 13 गुन्हे नोंदवले आहेत. यात 400 लोकांची नावं आहेत. या आंदोलनादरम्यान एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्यांना वॅनमध्ये भरुन घेऊन जात होते. या दरम्यान रस्त्यावर असलेल्या दुसऱ्या आंदोलकांनी वॅनचा दरवाजा […]
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीत मोठे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. संसदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला. ज्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांवरही हल्ले केले जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. संसद परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. हेच नाही तर […]
Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या महिन्याभरापसून आंदोलन सुरू आहे. आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्तेय सोनम वांगचुक यांना सरकारने बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केल्यावर, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि अनेक आंदोलनकर्ते पुढे सरसावले आणि त्यांनी उपोषण सुरू केलं. मात्र या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे संतापाच वातावरण […]
नवी दिल्लीत आंदोलन पेटले; आता अण्णा हजारे मैदानात उतरले
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पक्षाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं आहे. या आंदोलनामुळे कॉक्रोच जनता पार्टी आणि पोलिसांमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. जंतर-मंतरवर मध्यरात्री आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आता देशभरात पसरलं आहे. देशातील विविध राज्यात कॉक्रोच जनता पक्षाला पांठिबा मिळत आहे. […]