• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

घरात मार खायचे आणि बाहेर मी… प्रसिद्ध अभिनेत्रीला पहिल्या लग्नाचा हादरवणारा अनुभव

August 28, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी ही तिच्या बेधडकपणासाठी प्रसिद्ध आहे. तिने तिचं खासगी आयुष्य कधीच चाहत्यांपासून लपल नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती पहिल्या लग्नातील कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने बोलली. या नात्यात आपल्याला कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत काम्याने बंटी नेगी यांच्यासोबतच्या पहिल्या लग्नाच्या आठवणी सांगितल्या. लग्न झालं तेव्हा ती अवघी 25 वर्षांची होती. त्याआधी ते दोघे तीन वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र, काम्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नात्यात सुरुवातीपासूनच अनेक अडचणी होत्या. लग्नाआधीपासूनच दोघांमध्ये वारंवार भांडणं आणि मतभेद व्हायचे.

पालकांनीही घातली होती समजूत

काम्याने सांगितलं की, हे नातं योग्य नाही, असं मला पालकांनीही समजावून सांगितलं होतं. मात्र, त्या वेळी पहिल्या प्रेमाच्या भावनेत मी कोणाचंही ऐकलं नाही.  हे नातं वाचवण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न केले. नंतर वेगळे होण्याचा निर्णय घेताना ‘आपण नाते टिकवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत’ अशी खंत मनात राहू नये, अशी माझी इच्छा होती, असं काम्या म्हणाली. लोक मला सांगतात की, तू तुझ्या आयुष्यातील 13 वर्षे वाया घालवलीस. पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले.

घरी मारहाण व्हायची आणि बाहेर मी..

पहिल्या लग्नात झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दल बोलताना काम्याने अनेक धक्कादायक अनुभव शेअर केले. तिने सांगितलं की, मारहाणीमुळे चेहऱ्यावर झालेल्या जखमांच्या खुणा लपवण्यासाठी मला घराबाहेर पडण्यापूर्वी मेकअप करावा लागत असे. एकदा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जात असताना मला स्वतःचीच लाज वाटत होती, असंही तिने नमूद केलं. “घरी मला मारहाण होत होती आणि बाहेर जाऊन मी पुरस्कार स्वीकारत होते. मी स्वतःला विचारायचे की, मी हे आयुष्य का जगत्ये? आणि कोणाला काय सिद्ध करण्यासाठी हे सगळं सहन करत्ये?” असा भयानक अनुभव काम्याने सांगितला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamya Punjabi Dang (@panjabikamya)

मी अनेकदा स्वतःला खोलीत बंद करून तासन्तास रडायचे. काही वेळा तर संपूर्ण रात्र बाथरूममध्ये घालवावी लागली असं त्या काळातील मानसिक त्रास आठवताना काम्याने सांगितलं. कॉमेडी शोच्या रिहर्सलच्या वेळीही चेहऱ्यावरील जखमांच्या खुणा लपवण्यासाठी जास्त मेकअप करून सेटवर जायचे, असं तिने सांगितलं.

काम्याच्या आयुष्यातील या कठीण काळात तिची मुलगी आरा हा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. एकदा तिने आई-वडिलांमधील भांडण पाहिलं आणि त्यानंतर आता या नात्यात राहणं योग्य नसल्याचं काम्याला जाणवलं. अखेर तिने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काम्या पंजाबी आणि बंटी नेगी यांचं लग्न सुमारे 13 वर्षे टिकलं. दोघांना एक मुलगी आहे. या नात्याचा शेवट झाल्यानंतर काम्याने आपल्या आयुष्यात नव्याने सुरुवात केली. 2020 मध्ये काम्याने शलभ डांगशी दुसरं लग्न केलं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 30 वर्षांपूर्वी वडिलांचे स्वप्न तुटले, मुलाने घेतली टीम इंडियात एन्ट्री! अयान अकरमच्या प्रवासाची थक्क करणारी गोष्ट
  • भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ
  • गाणं पाहिजे तर असं, ज्यावर आजही पार्टीत लोक धरतात ठेका, 53 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
  • Rakshabandhan 2026 : जेनिलिया, कंगनापासून ते प्रीति झिंटापर्यंत.. बॉलिवूडचं खास रक्षाबंधन सेलिब्रेशन !
  • मक्का करार भारतासाठी धोकादायक का ठरू शकतो? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in