• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

30 वर्षांपूर्वी वडिलांचे स्वप्न तुटले, मुलाने घेतली टीम इंडियात एन्ट्री! अयान अकरमच्या प्रवासाची थक्क करणारी गोष्ट

August 28, 2026 by admin Leave a Comment


अयान अकरम.. अंडर 19 टीम इंडियात निवड झालेल्या खेळाडूची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अयान इथपर्यंतचा प्रवास खडतर होता. अयान भारतीय संघात पाहण्याचं स्वप्न त्याच्या वडिलांचं होतं. त्यांनी तीन दशकं हे स्वप्न उराशी बाळगून होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्याची इच्छा अयान अकरमचे वडील अकरम सैफी यांची होती. पण आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्याचं हे स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे त्यांनी हे स्वप्न त्यांच्या मुलात पाहिलं. मुलाला भारतीय संघात स्थान मिळावं यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. अखेर हे स्वप्न पूर्ण झालं आहे. उत्तर प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू अयान अकरम यांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर 19 मल्टी डे सामन्यांच्या अंडर 19 संघात निवडलं गेलं आहे. त्यामुळे त्याचंच नाही तर त्याच्या वडिलांचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.

अयान अकरमन आपल्या वडिलांनी क्रिकेटसाठी घेतलेली मेहनत पाहिली आहे. त्यांच्या अपयशाच्या कहाण्याही ऐकल्या आहेत. पण त्यांची जिद्द मात्र कायम होती आणि त्यातूनच त्याला स्फुरण मिळालं. अयान अकरमन हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं की , ‘आता माझ्याकडे माझ्या वडिलांचं भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. मी त्यांच्या खडतर आयुष्याच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या आणि अनुभवल्या आहेत. पण मला आता वाटतं की मी त्यांच्यासाठी क्रिकेटचे चांगले दिवस आणू शकतो.’

अयान अकरमची क्रिकेटमधील ओळख 16व्या वर्षापासून निर्माण होण्यास सुरूवात झाली. 2023-204 मध्ये अंडर 16 पर्वात अष्टपैलू कामगिरी करत 200हून अधिक धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या नावावर 25 विकेट होत्या. अंडर 19 क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यानंतर त्याने या संधीचं सोनं केलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंडर 19 क्रिकेटमध्ये एका पर्वात 37 विकेट काढल्या. भारतात अंडर 19 स्तरावर सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला. त्याने गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतही कमाल केली. त्याने खालच्या फळीत फलंदाजी करताना 300हून अधिक विकेट काढल्या. यात एका शतकाचा समावेश आहे.

मल्टी डे सामन्याासाठी संघ

  • कर्णधार: यशवर्धन चौहान
  • उपकर्णधार: लक्ष्य रायचंदानी
  • यष्टीरक्षक : अन्वय द्रविड, सुमित मिश्रा
  • फलंदाज / अष्टपैलू : अयान अकरम, विहान मल्होत्रा, अभिजित पवार, आशिष चौधरी, आयुष म्हात्रे
  • वेगवान गोलंदाज : रोहित यादव, सागर विर्क, ख्रिस्तियान फर्नांडिस
  • स्पिनर्स : समर्थ राय, अभिनव कन्नन, सोहम पटवर्धन



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?
  • ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा येणार नाहीत
  • Mamata Banerjee : … तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा
  • मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा
  • त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in