• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मक्का करार भारतासाठी धोकादायक का ठरू शकतो? जाणून घ्या

August 28, 2026 by admin Leave a Comment


सध्या मक्का करार चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. सात ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान या तीन देशांनी मक्का येथे एका संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार या तीन देशांपैकी एकावर जरी हल्ला झाला तर तो या करारामध्ये सहभागी असलेल्या इतरही देशांवर हल्ला मानला जाणार आहे. या कराराला नाटो देशांमध्ये जो नियम आहे, तोच नियम लागू करण्यात आला आहे. सुरुवातीला जरी हा फक्त काही मुस्लिम देशांमध्ये झालेला एक साधा करार वाटत असला तरी देखील या मक्का करारामुळे भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या करारामध्ये फक्त तीन देश सहभागी झाले आहेत. मात्र लवकरच या कराराची व्याप्ती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. भारताचा शेजारी देश असलेल्या बांग्लादेशने देखील या करारामध्ये सहभागासाठी उत्सुकता दाखवली आहे. हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकतो.

सात ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान या तीन देशांमध्ये हा करार झाला, परंतु आता याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या करारामध्ये पश्चिमेकडील जवळपास सर्वच मुस्लिम देश सहभागी होऊ शकतात. जसं की, कतार, कुवैत, बहरीन, जॉर्डन, मिस्त्र, या देशांसोबत एक डझन पेक्षा अधिक देश या करारामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानसोबतच बांग्लादेश देखील या करारामध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याने भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण यातील अनेक देशांसोबत भारताचे पूर्वीपासून व्यापारी संबंध आहेत.

बांग्लादेशमुळे टेन्शन वाढणार

दरम्यान या मक्का कारारामध्ये बांग्लादेश देखील सहभागी होण्यास उत्सुक आहे, एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे बांग्लादेश असं हे गणित आहे. बांग्लादेश हा भारताचा महत्त्वाचा ट्रेड पार्टनर आहे, भारताचा बांग्लादेशसोबतचा व्यापार हा 12-14 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे व्यापारामध्ये घट झाली आहे, मात्र तरी देखील बांग्लादेश हा भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?
  • ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा येणार नाहीत
  • Mamata Banerjee : … तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा
  • मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा
  • त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in