• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता चिंताच मिटली, भारताला LPG साठी मिळाला नवा भिडू, मोठ्या प्रमाणावर आयात वाढणार

August 28, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका – इस्रायल युद्धाने होर्मुझ सामुद्रधुनीचा समुद्री मार्ग ठप्प झाल्याने देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक लोकांना याची झळ सोसावी लागली. इराण- अमेरिकेची बोलणी आता पुन्हा कधी सुरु होतील याचा कोणतीही शक्यता आता उरलेली नाही. त्यातच आता भारताला एलपीजीचा पुरवठा कायम राहावा यासाठी नव्या मित्रांना शोधावे लागले आहे. आता भारताला एलपीजी पुरवणारा नवा भिडू सापडला आहे. त्यामुळे अमेरिका, युएई नंतर हा तिसरा देश एलपीजी पुरवठ्यास भारताला मदतगार ठरला आहे.

कस्टम आणि जहाजांच्या येजा करण्यावर नजर ठेवणारी कंपनी केप्लरच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये आतापर्यंत अल्जेरियाने भारताला 1,10,711 टन LPG पाठवला आहे. हा ऑगस्टमध्ये भारताने आतापर्यंत आयात केलेल्या सुमारे 10.8 लाख टन LPG च्या सुमारे 10 टक्के आहे.

मिंटच्या बातमीनुसार ऑगस्टमध्ये अमेरिका हा भारताला LPG पाठवणारा सर्वात मोठा पुरवठादार होता. अमेरिकेने आतापर्यंत 6,22,536 टन LPG पाठवला आहे. तर संयुक्त अरब अमिरातने (UAE) 1,40,266 टन एलपीजी पाठवत दुसरा क्रमांक गाठला आहे. त्यानंतर आता अल्जेरियाचा क्रमांक लागला आहे. अल्जेरियातून भारताला सतत एलपीजीचा पुरवठा वाढत चालला आहे. अल्जेरियाची सरकारी कंपनी सोनाट्रॅक जगातील सर्वात मोठी एलपीजी निर्यातक कंपन्यांपैकी एक आहे. एलपीजीच्या निर्यातीच्या बाबतीत ही सरकारी कंपनी सौदीच्या अरामको कंपनीनंतर जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.

भारताला अल्जेरिया का महत्वाचा

हा बदल भारतासाठी फायद्याचा आहे. भारत जगातला घरगुती एलपीजी खरेदी करणारा जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे. देशात सुमारे 34 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. भारताला दरवर्षी सुमारे 3.3 कोटी टन एलपीजीची गरज लागते. ज्यातील सुमारे 65 टक्के हिस्सा दुसऱ्या देशातून आयात केला जातो. या आयातीवर भारत सुमारे 11 अब्ज डॉलर खर्च करतो. भारताच्या एलपीजीच्या पुरवठ्याच्या सुमारे ९० टक्के हिस्सा पश्चित आशियाई देशातून येतो. अशा पश्चिम आयातील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची येजा थांबल्याने भारताच्या एलपीजीवर परिणाम झाला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 30 वर्षांपूर्वी वडिलांचे स्वप्न तुटले, मुलाने घेतली टीम इंडियात एन्ट्री! अयान अकरमच्या प्रवासाची थक्क करणारी गोष्ट
  • भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ
  • गाणं पाहिजे तर असं, ज्यावर आजही पार्टीत लोक धरतात ठेका, 53 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
  • Rakshabandhan 2026 : जेनिलिया, कंगनापासून ते प्रीति झिंटापर्यंत.. बॉलिवूडचं खास रक्षाबंधन सेलिब्रेशन !
  • मक्का करार भारतासाठी धोकादायक का ठरू शकतो? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in