अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या हातात कारभार घेतल्यापासून राज्यभर हॉटेल, रेस्टारंटवर जोरदार कारवाई केली जात आहे. मोठ्या मोठ्या नामांकित हॉटेल आणि रेस्टारंटचे परवाने तुकाराम मुंडे यांनी रद्द केले. मी रस्त्यावरील अन्न खात नाही फक्त नामांकित हॉटेलमध्येच जेवण करतो म्हणणारे सर्वजण तोंडावर पडली आहेत. कारण हे प्रसिद्ध हॉटेल आहेत, तिथेही धाडीमध्ये […]
Archives for July 2026
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी संवाद; काय म्हणाले?
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधत अधिवेशन हे फायदेशीर ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली. याचवेळी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मान्सून आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन्ही सक्रिय राहिले तर देशाच्या विकासाला गती मिळते. या अधिवेशनातून जनतेच्या हिताचे निर्णय […]
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; शिवाजी पार्कातील आंदोलनप्रकरणी पोलिसांत 3 गुन्हे, कारण काय?
मुंबईच्या दादरमधून मोठी बातमी आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काल शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या आंदोलनावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सभा झाल्यानंतरही आंदोलक शिवाजी पार्क मैदान रिकामे केलं नव्हतं. सभेनंतरही आंदोलन शिवाजी पार्क मैदान सोडायले तयार नव्हते. ही सभा विनापरवानगी घेतल्याचंही समोर आलं आहे. […]
IND vs ENG: कर्णधार गिलने ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच केला घात, लॉर्ड्स सामन्यात कोण ठरला व्हिलन?
भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका पार पडली. भारतीय संघाने ही मालिका गमावली. टी-20 मालिकानंतर आता वनडे मालिका गमावावी लागली. या सामन्यात भारतीय संघाचा अर्धा संघ बदलावा लागला, अनेक दुखापतग्रस्त खेळाडू शेवटच्या सामन्यापूर्वी संघाच्या बाहेर पडले. अनेक बदलांचा परिणाम शेवटी भारतीय संघाला मालिका गमवावी लागली. आता या लॉर्ड्सच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने त्याच्या लाडक्या खेळाडूवर […]
‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट; जय-शरूची पावसातील केमिस्ट्री हिट, प्रोमोवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव
झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे'या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.या मालिकेत जय आणि शरू यांच्या नात्यात आता हळूहळू जवळीक वाढताना दिसत आहे. अलीकडच्या काही घटनांमुळे जयचा शरूवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रॉडक्ट लॉन्चदरम्यान तो तिच्या निर्णयांवर विश्वास दाखवतो. आता दोघं एका ऑफिस पार्टीत जातात, जिथे त्यांना चुकून जोडपं समजलं जातं. पार्टीतून […]
अखेर प्रकरण पेटलंच! जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज अन्…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनाने मोठं रुप घेतलंय. संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हजारोंच्या संख्येने आंदोलक जंतर-मंतर परिसरात जमले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला […]