
मुंबईच्या दादरमधून मोठी बातमी आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काल शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या आंदोलनावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सभा झाल्यानंतरही आंदोलक शिवाजी पार्क मैदान रिकामे केलं नव्हतं. सभेनंतरही आंदोलन शिवाजी पार्क मैदान सोडायले तयार नव्हते. ही सभा विनापरवानगी घेतल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचे समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विना परवानगी आंदोलनाचे आयोजन केल्या प्रकरणी ठाकरेंच्या आंदोलनाचे आयोजकांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंदोलनास परवानगी नसतानाही लोकांना आंदोलन ठिकाणी जमण्यास आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आंदोलनानंतरही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दादर परिसरात ठिकठिकाणी आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या ही मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिसांनी तिसरा गुन्हा दाखल केलाय. या तीनही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Leave a Reply