• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सूपमध्ये सापडले झुरळ, फ्रिजमधील मांस पाहून थेट परवाना रद्द, तुकाराम मुंडे यांची मोठी कारवाई..

July 20, 2026 by admin Leave a Comment


अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपल्या हातात कारभार घेतल्यापासून राज्यभर हॉटेल, रेस्टारंटवर जोरदार कारवाई केली जात आहे. मोठ्या मोठ्या नामांकित हॉटेल आणि रेस्टारंटचे परवाने तुकाराम मुंडे यांनी रद्द केले. मी रस्त्यावरील अन्न खात नाही फक्त नामांकित हॉटेलमध्येच जेवण करतो म्हणणारे सर्वजण तोंडावर पडली आहेत. कारण हे प्रसिद्ध हॉटेल आहेत, तिथेही धाडीमध्ये मोठी घाण आणि उंदीर फिरताना दिसून आले. मोठ्या कंपन्यांकडूनही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे स्पष्ट झाले. नुकताच तुकाराम मुंडे यांच्या एफडीए विभागाने नागपूरमधील प्रसिद्ध हीरा स्वीट्सवर धडक कारवाई केली. तिथे किचन तपासले असता थेट मेलेले उंदीर आढळून आले. त्यानंतर थेट त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

नागपूरच्या अशोका रेस्टारंटमध्ये ग्राहकाने सूप मागवला होता. या सूपमध्ये चक्क मेलेले झुरळ आढळून आले. ज्यानंतर खळबळ उडाली. कुणाल नरसापूरकर रेस्टारंटमध्ये जेवणासाठी गेले असता त्यांच्या सूपमध्ये झुरळ आढळून आले. या प्रकारानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने याची दखल घेतली. त्यानंतर हॉटेलवर धाड टाकण्यात आली. हेच नाही तर त्यांचा परवाना देखील रद्द करण्यात आला.

किचनमध्ये तपासणी केली असता प्रचंड अशी अस्वस्छता यावेळी दिसून आली. हेच नाही तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे धाडीमध्ये प्रशासनाला दिसून आले की, फ्रिजमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ होते. अयोग्य पद्धतीने हे पदार्थ साठवण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसून आले. असा प्रकार कुठेही आढळून आला की, तक्रार करण्याचे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून केले जात आहे.

यासोबतच हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला. तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात जोरदार कारवाया सुरू असल्याचे दिसत आहे. भेसळयुक्त दुधावरही कारवाई केली जात आहे. 25 टक्के दुधाचे उत्पन्न तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हातात घेतल्यानंतर कमी झाले. भेसळयुक्तांचे धाबे दणाणले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लीबोल
  • ‘अभिनेत्याशी लग्न म्हणजे…’ अर्शद वारसीशी लग्नाआधी जया बच्चन यांनी मारियाला दिला होता इशारा
  • Manoj Jarange Patil: आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, शेतातलं पिकच… होतंय कौतुक
  • Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
  • Aditi Tatkare PRO: धक्कादायक! आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in