भिवंडीच्या नारपोलीत कोहिनूर इमारत कोसळल्याची घटना घडली. या इमारत दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ठेकेदाराकडून इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. इमारत दुर्घटनेत मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बचाव पथकाकडून रात्रीपासून बचाव कार्य सुरू आहे. कोहिनूर इमारत दुर्घटनेविषयी मंत्री […]
Archives for July 2026
भोंदू खरातचं दर्शन घेतल्यापासून चंद्रकांतदादांची बुद्धी भ्रष्ट; धंगेकरांचा जोरदार हल्ला
राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाबाबतचं अजब विधान केलं आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांचे पायाचे ठसे दगडावर उमटले आहेत. त्या ठश्यांना आधारशी लिंक करून त्यांची ओळख पटवली जाणार आहे, असं दिल्ली पोलिसांचं अॅनालिसिस असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. चंद्रकांतदादांच्या या विधानचा सर्वांनीच समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. महायुतीतील महत्त्वाचा […]
‘सैराट’मधल्या ‘सल्या’ची वडिलांसाठी भावूक पोस्ट; ‘असं सोडून जायचं नव्हतं..’
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अरबाजचे वडील अस्लम शेख यांचं गुरुवारी सकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या महिनाभरापासून ते आजारी होती. मेंदू विषयक विकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वडिलांच्या निधनानंतर अरबाज पूर्णपणे खचला असून त्याने सोशल मीडियावर […]
1 वाजता दिल्लीत कॅबिनेटची बैठक, घडामोडींना वेग, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल घोषणा होणार? एक तासात..
नीट पेपरफुटी त्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन अशा अनेक घडामोडी दिल्लीत घडताना दिसल्या. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पावसाळी अधिवेशनातच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सांगितले जातंय. अनेकांना केंद्रीय मंत्रिमंडळातून नारळ मिळणार तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देखील मिळणार आहे. यादरम्यानच आता दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 1 वाजता आहे. […]
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
UG-NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ने आयोजित केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या हिंसाचारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनादरम्यान काही असामाजिक घटकांनी दगडफेक केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला असून, या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जखमी पोलिसांच्या कुटुंबीयांनी पत्रकार […]
Ajinkya Rahane: मध्यरात्री 1 वाजता अजिंक्यसाठी रोहितची भावुक करणारी पोस्ट, लाडक्या अज्जूबद्दल काय बोलला?
भारतीय क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास दोन दशके भारतीय संघाची सेवा करणाऱ्या रहाणेने, इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ शेअर करून आपल्या निर्णयाची घोषणा केली. रहाणेने व्हिडिओ शेअर करताच अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या शुभेच्छा त्याला दिल्या. आता भारताचा माजी कर्णधार आणि मुंबई संघातील त्याचा दीर्घकाळचा सहकारी रोहित शर्मानेही […]