
अलिकडच्या काळात मानवी वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात साप आढळून येत आहेत. विशेष करून यामध्ये घोणस जातीच्या सापांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. हा साप अतिशय विषारी आहे. तसेच तो प्रचंड चपळ देखील असतो. तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तर तुम्हाला संर्पदंश होऊ शकतो. हा साप मानवी वस्तींमध्ये का आढळून येतो? तर याचं मुख्य कारण म्हणजे या सापांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, तसेच मानवी वस्तीभोवती जे वातावरण असतं, त्या वातावरणाशी या सापाने जुळून घेतलं आहे, उंदिर, घुशींमुळे या सापाच्या शिकारीचा देखील प्रश्न सुटतो, त्यामुळे हा साप सध्या मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.
घोणस प्रमाणेच भारतामध्ये सापांच्या आणखी तीन विषारी प्रजाती आढळून येतात, त्यामध्ये फुरसे, मण्यार आणि नाग यांचा समावेश होतो. अनेकदा नाग देखील तुम्ही तुमच्या परिसरात पाहिले असतील, हे प्रजातीचे साप फडी काढतात त्यामुळे ते सहज ओळखू येतात. तर मण्यार देखील प्रचंड असा विषारी साप आहे. याला निशाचार म्हणतात कारण हा शिकारीसाठी रात्रीच बाहेर पडतो. त्यामुळे झोपेत ज्या काही सर्पदंशाच्या घटना होतात, त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा या सापाचा असतो. हा साप चावल्याचं कळत नाही, आणि उपचारासाठी उशिर झाला तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो.
दरम्यान सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर मोठ्या प्रमाणात साप हे घरात येऊ शकतात. साप घरात येऊ नये, यासाठी तुम्ही काही पारंपरिक उपाय देखील करू शकतात. आजही हे उपाय आदिवास्ती वस्ती वाड्यांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये केले जातात. अफुमारी नावाची एक विशिष्ट वनस्पती असते, ही नवस्पती प्रचंड कडू असते. ही नवस्पती वाळवून तिचं द्रव मिश्रण करावं, आणि जिथून- जिथून तुम्हाला साप घरात येण्याची शक्यता वाटते तिथे-तिथे हे मिश्रण फवारल्यास शक्यतो साप घरात येत नाहीत, दुसरं म्हणजे तुम्ही मसाल्यांचे पदार्थ कांदा आणि लसून यांना एकत्र करून देखील एक मिश्रण तयार करू शकतात. याच्या वासापासून देखील साप दूर रहतात.
Leave a Reply