
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. एकामागोमाग एक धाडी पडायला सुरुवात झाल्या. आता यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील बाजारपेठेतून रोजचे किमान 20 लाख लिटर दूध अचानक गायब होत आहे. या दुधाची रोजची किंमत आठ कोटी तर महिन्याची तब्बल 240 कोटी रुपये इतकी आहे. अचानक गायब होणारे हे दूध भेसळ व रसायनयुक्त असल्याचे एएफडीएच्या धाडीत निषपन्न झाले. कृत्रिम पद्धतीने दूध कसे तयार केले जाते? त्यात कोणती रसायने मिसळजी जातात? स्लो पॉयझन असलेल्या रसायनांचा काय परिणाम होतो? आता असे अनेक प्रश्न पडले आहेत. तर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृत्रिम दूध कसे तयार केले जाते?
कृत्रिम दूध कसे तयार केले जाते?
जे दूध नैसर्गिक असते त्या दुधात पाणी, फॅट, प्रोटीन्स (केसीन), लॅक्टोज (साखर) व खनिजे असतात. कृत्रिम दुधात या घटकांची रसायने वापरली जातात. पाणी कृत्रिम दुधाचा मुख्य भाग आहे, त्यात आधी दुधाचा विरहित घनपदार्थ व नायट्रोजन मिसळले जाते. हे दोन्ही नैसर्गिक दुधासारखी दिसण्यासाठी युरिया किंवा अमोनियम सल्फेट यात मिसळले जाते.
या दुधातील फॅटसाठी यात अतिशय हलक्या दर्जाचे रिफाइंड तेल, व्हेजिटेबल ऑइल किंवा डालडा अथवा पामतेल मिसळले जाते. पाणी व तेल एकत्र मिसळू न शकल्याने त्यात डिटर्जंट पावडरही टाकली जाते. डिटर्जंटमुळे तेल व पाणी एकमेकांत मिसळल्याने दुधासारखे दाट व पांढरे फेसाळ दिसते, नैसर्गिक दुधाप्रमाणे पांढरा रंग, दाटपणा आणण्यासाठी त्यात स्टार्च, मैदा, लिक्विड पॅराफिन किंवा ब्लॉटिंग पेपरचे पाणी मिसळतात. दुधाला नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी त्यात हलकीशी ग्लुकोज पावडरही मिसळली जाते.
नैसर्गिक दूध आणि कृत्रिम दूध ओळखायचे कसे ?
लाकूड, काच किंवा फरशीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. तो पृष्ठभाग थोडासा तिरपा करा. नैसर्गिक दूध हळूहळू खाली सरकते आणि पांढरी रेषा/डाग मागे सोडते. भेसळयुक्त दूध पटकन खाली वाहून जाते आणि डाग सोडत नाही.
Leave a Reply