• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 वाजता दिल्लीत कॅबिनेटची बैठक, घडामोडींना वेग, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल घोषणा होणार? एक तासात..

July 31, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी त्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन अशा अनेक घडामोडी दिल्लीत घडताना दिसल्या. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पावसाळी अधिवेशनातच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे सांगितले जातंय. अनेकांना केंद्रीय मंत्रिमंडळातून नारळ मिळणार तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देखील मिळणार आहे. यादरम्यानच आता दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 1 वाजता आहे. या बैठकीकडे राज्याच्या नजरा आहेत. संसदेत विरोधकांकडून हंगामा केला जात आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनात केंद्रीय मंत्र्यांची बैठक कालच झाली. या बैठकीला अमित शाह, राजनाथ सिंह, एस जयशंकर आणि निर्मला सीतारमन उपस्थित होते. या बैठकीत अजित डोभाल देखील उपस्थित होते.

विरोधक संसदेत हंगामा करताना दिसत आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याच्या तयारीत सत्ताधारी आहेत. राहुल गांधींच्या भाषणातील काही शब्दांमुळे मोठा वाद निर्माण झाला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन करताना दिसले. विद्यार्थ्यांचे आंदोलन जंतर मंतरवर सुरू असताना त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

आजच्या कॅबिनेट बैठकीत नक्की काय निर्णय होतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस संसदेत सरकारला धारेवर धरताना दिसत आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर मोदी सरकारमधील पहिला राजीनामा झाला. यासोबतच कॉकरोच जनता पार्टीने पुन्हा एकदा आंदोलनाचा मोठा इशारा दिला.

आजच्या कॅबिनेट बैठकीत काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात. तश्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेसाठी ही बैठक पार पडेल. राज्यसभा तहकूब करण्यात आली. संसदेत विरोधक गोंधळ घालत आहेत. पेपरफुटी विरोधातील विधेयक संसदेत मंजूर करण्यात आला. याबाबत माहिती देणारा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केला. नरेंद्र मोदी यांच्या या व्हिडीओवर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी कमेंट दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in