• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इमारतीत 30 कुटुंब, ठेकेदारांकडून दुरुस्तीचं काम, 9 जणांचा मृत्यू; भिवंडी दुर्घटनेबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितली धक्कादायक माहिती

July 31, 2026 by admin Leave a Comment


भिवंडीच्या नारपोलीत कोहिनूर इमारत कोसळल्याची घटना घडली. या इमारत दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ठेकेदाराकडून इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. इमारत दुर्घटनेत मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बचाव पथकाकडून रात्रीपासून बचाव कार्य सुरू आहे. कोहिनूर इमारत दुर्घटनेविषयी मंत्री गिरीश महाजन यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी भिवंडीतील दुर्घटनास्थळी भेट दिली. या भेटीनंतर महाजन यांनी इमारतीची धोकादायक बी विंग तातडीने पाडण्याचे निर्देश दिले. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाईल, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘ अतिशय दुर्दैवी घटना भिवंडीच्या नारपोली येथे घडली. ही घटना रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. चार जण जखमी झाले आहेत. अजूनही शोधकार्य सुरू आहे. ही इमारत 2007 साली तयार झालेली होती. फार वर्ष या इमारतीला झालेली नाही. पण दुर्दैवाने ही इमारत कोसळली. प्रशासनाने दोन वेळा इमारत रिकामी करण्याचे सांगितले होते.

‘इमारत कोसळली, त्यावेळी दुरुस्तीचं काम सुरू होतं. घटनास्थळी कॉलम वगैरे दिसत आहे. ठेकेदार काम करत होता. इमारतीत 30 कुटुंब राहत होतं. त्यांना बाहेर काढण्यात आलं. परंतु काही जण इमारतीत होते. त्यामुळे मजुरांसिहत काही रहिवासी दुर्घटनेत सापडले. अजूनही शोधकार्य सुरू आहे. अद्याप 3-4 लोक ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. प्रशासनाचे अधिकारी देखील घटनास्थळी आहेत. सर्व लोकप्रतिनिधी आहेत, असे ते म्हणाले.

‘एनडीआरएफने वाचवण्याचा प्रयत्न केला. यात 9 जणांचा मृत्यू झाला. इमारत दुरुस्ती करण्याआधी पालिकेची परवानगी घ्यायची असते. परंतु अशी कोणतीही परवानगी ठेकेदाराने घेण्यात आलेली नव्हती. ठेकेदाराकडून चूक झाली, त्यानंतर इमारत कोसळली. इमारतीचीची बि विंग कोसळली. ए विंग देखील अशीच आहे. इमारत आता रिकामी करण्यात आली आहे. उर्वरित इमारत तोडावी लागेल. अन्यथा दुसरी एखादी घटना घडू शकते. त्यामुळे सूचना केलेल्या आहेत. बचाव पथक रात्रीपासून जागून जिवंत वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आता इमारतीची दुसरी विंग तात्काळ पाडावी लागेल. ती कमकुवत झाली आहे. ती इमारत धोकादायक आहे. ती इमारत तात्काळ रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in