
लातूरच्या उदगीरमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उदगीरच्या सीएने तब्बल 2 हजार 134 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उदगीर शहरात गुन्हा दाखल करून आरोपी सीए श्याम कलानीला अटक करण्यात आली. त्यानंतर आज सोमवारी आरोपी कलानीला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
16 बोगस कंपन्यांवर निधीसाठी बोगस कागदपत्रे केल्याचा आरोप
आयकर विभागाचे गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाकडून आरोपीची चौकशी सुरू होती. या चौकशीतून सर्व घोटाळा समोर आला. उदगीरमधील तपासानंतर पथकातील अधिकारी चक्रावून गेले . घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यानंतर पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे उपआयकर विभागाचे संचालक दीपक कुमार यांनी तक्रार केली. श्याम कलानीसह 16 कंपन्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गन्हा दाखल करण्यात आला. श्याम कलानीने 16 कंपनीच्या संगणमताने घोटाळा केलाय. श्याम कलानी सह इतर 16 कंपन्यांवर 02 हजार 143 कोटी, 43 लाख रुपयांचा निधी बनावट कागदपत्रे तयार करून परदेशात पाठविण्यात आल्याचा आरोप आहे.
महाघोटाळ्याने संपूर्ण शहरात खळबळ
कलानीने चुकीच्या पद्घतीना वापर करून आर्थिक लाभाच्या हेतूने निधी परदेशी पाठवण्यास मदत केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या घोटाळ्याचा तपास लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. 2 हजारांहून अधिक कोटींच्या महाघोटाळ्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोर्टात हजर करणार, आणखी काय खुलासे होणार?
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक भगीरथी पवार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. आता या प्रकरणाच्या चौकशीनंतर एवढ्या मोठ्या रकमेची कथित आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यात आरोपीला कोर्टात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचे आणखी खुलासे होतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच कोर्टात त्यांच्यावर आणखी कारवाई केली जाते, याकडेही साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
Leave a Reply