• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Toxic मध्ये कियाराचे यशसोबत इंटिमेट सीन्स; बायकोबद्दल सिद्धार्थ म्हणाला ‘हे सर्वांत जास्त..’

August 10, 2026 by admin Leave a Comment


Toxic : कन्नड सुपरस्टार यश याचा बहुप्रतिक्षीत ‘टॉक्सिकः ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं ट्रेलर आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे, त्यामागे कारण देखील तसं आहे. सिनेमात यश याचा भन्नाट अंदाज चाहत्यांना थक्क करत आहे. या क्राईम थ्रिलरमध्ये यश दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये यशची झलक चाहत्यांना घायाळ करत आहे. तर अभिनेत्री कियारा देखील सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सागंयाचं झालं तर, ‘टॉक्सिक’ (Toxic) या सिनेमातील ‘तबाही’ (Tabahi) हे पहिलं गाणं देखील प्रदर्शित झालं असून, त्यात यश आणि कियारा यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली आहे.

मात्र, यातील काही इंटिमेट सीनमुळे कियाराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कियाराला तिचा पती सिद्धार्थ मल्होत्राचा पाठिंबा मिळाला आहे; ‘टॉक्सिक’चा ट्रेलर शेअर करताना सिद्धार्थने कियाराच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं. सध्या सिद्धार्थ याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर ‘टॉक्सिकः ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ सिनेमाचा ट्रेलर शेअर करत सिद्धार्थ याने बायकोच्या अभिनयाचं कौतुक करत सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेता पोस्ट करत म्हणाला, ‘परिश्रम, समर्पण आणि जिद्द… हे सर्व काही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. Ki हा तुझा सर्वोत्तम सिनेमांपैकी एक ठरणार आहे!! गीतू मोहनदास, यश, तू आणि संपूर्ण टीमने निर्माण केलेली जादू पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘टॉक्सिक’टीमला खूप खूप शुभेच्छा. 26 ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत आहे.’

सांगायचं झालं तर, सिद्धार्थची प्रतिक्रिया अशा वेळेस समोर येत आहे, जेव्हा कियारा यश याच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. सिनेमात यश, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यशच्या करिअरमधील हा 19 वा चित्रपट असून ‘केजीएफ’च्या सीरिजनंतरचा हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट आहे.

 

 

 

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in