• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?

August 25, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चांना उधाण आलेलं असतानाच त्यांचा मुलगा यशवर्धन अहुजा याच्याबद्दल एक वेगळीच बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. कॉमेडीयन जॉनी लिव्हरची मुलगी आणि अभिनेत्री जेमी लिव्हर हिचं यशवर्धन अहुजासोबत लग्न होणार असल्याचा दावा करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओवर अखेर जेमीने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जेमी लिव्हर आणि यशवर्धन अहुजा लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा करण्यात आला. सुरुवातीला हे व्हिडीओ पाहून जेमीला गंमत वाटली, मात्र जेव्हा मोठ्या प्रमाणात ही माहिती शेअर होऊ लगाली आणि तिला फोन कॉल्स येऊ लागले, तेव्हा तिने यावर स्पष्टीकरण देण्याचा निर्णय घेतला.

जेमी लिव्हरने या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होणारे लग्नाचे व्हिडीओ पूर्णपणे बनावट आहेत. तिने यशवर्धनसोबत कोणताही रोमँटिक संबंध नसल्याचं सांगत तो माझ्यासाठी लहान भावासारखा असल्याचं स्पष्ट केलं. तसंच चुकीची माहिती पसरवणारे हे व्हिडीओ हटवण्याचं आवाहनही तिने केलं.

जेमी म्हणाली, “माझं लग्न.. मला माहीत आहे की बरेच लोक माझ्या लग्नाबद्दल काळजी करत आहेत. ते विचार करत आहेत की लग्न होणार की नाही, कधी होणार आणि यामुळे एआय वापरून काही बनावट व्हिडीओ तयार केले गेले आहेत. सुरुवातीला मी हे व्हिडीओ पाहून खूप हसले, मला खूप मजा आली. आम्ही चुलत भावंडं एकमेकांना व्हिडीओ पाठवत खूप धमाल करत होतो. पण आता मला खूप फोन कॉल्स येत आहेत. हे सगळे व्हिडीओ आणि ही सगळी माहिती खोटी आहे. अभिनंदन करणाऱ्या या फोन कॉल्समुळे मला अपेक्षित असलेली किंवा खरी लग्नाची स्थळंसुद्धा येत नाहीयेत. त्यामुळे मी लोकांना विनंती करते की त्यांनी असे व्हिडीओ बनवू नयेत.”

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

“हे सगळं खूपच कल्पक आहे आणि तुम्हाला आधीच खूप व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे आता तुम्ही ते व्हिडीओ डिलिट केले पाहिजेत. सर्वांच्या माहितीसाठी हे व्हिडीओ आणि ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. त्यामुळे कृपया त्यावर विश्वास ठेवू नका. यशवर्धन आणि मी एकत्र चित्रपटसुद्धा करणार आहोत. तो माझ्या भावासारखा आहे. त्यामुळे असे मूर्खपणाचे व्हिडीओ बनवू नका”, असं ती पुढे म्हणाली.

गोविंदा आणि सुनीता अहुजा यांचा मुलगा यशवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘हिरो की हिरोइन’ या चित्रपटातून तो अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं कळतंय.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर
  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in