• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

…तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

August 25, 2026 by admin Leave a Comment


अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी घडलेल्या घटनेत तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. तीन निष्पापांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन नवजात बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागं झालं. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तीन आई-वडिलांच्या पोटचा गोळा हिसकावून घेणाऱ्या घटनेच्या विरोधात सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अमरवातीच्या स्त्री रुग्णालयात पहाटे 3.30 वाजता नेमकं काय घडलं, याची माहिती समोर आली आहे.

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. रुग्णालयाच्या ज्या अतिदक्षता विभागात आगीची घटना घडली. त्या दुर्घटनाग्रस्त विभागाच्या जवळच्या दुसऱ्या युनिटमध्ये महिन्यापूर्वी वॉशिंग मशीन जळाली असल्याची माहिती आता समोर आली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार दडवून ठेवला. त्यांनी तेव्हा हा प्रकार वरिष्ठांना प्रकार सांगितला. तर विद्युत यंत्रणेतील बिघाड समोर आला असता आणि ही दुर्घटना टळली असती.

आग विझविणाऱ्या यंत्रणेच्या ढिसाळपणावर गंभीर प्रश्न

अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या एसएनसीयूमध्ये अग्नितांडव प्रकरणात एक्सपायर्ड फायर ऑडिट दुर्लक्ष आणि तिघा निष्पाप बाळांचा मृत्यू झाला आहे. 21 ऑगस्ट रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयातील फायर ऑडिटची मुदत संपली होती. फायर ऑडिटकडे पीडब्ल्यूडीच्या 38 दिवस दुर्लक्षाने तीन बाळांचा नाहक बळी झाला. 17 जुलै रोजी फायर ऑडिट करण्या संदर्भात पीडब्ल्यूडीला पत्र दिले होते. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊनही अलार्म वाजला नाही. काळीज पिळवटणाऱ्या आगीच्या यंत्रणेच्या ढिसाळपणावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.

अमरावतीमधील 36 नवजात बालकांची प्रकृती स्थिर

अमरावतीतील(Amravati) रुग्णालयात जखमी झालेल्या सर्व 36 नवजात बालकांची प्रकृती स्थिर आहे. सर्व बालके अमरावती शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आगीच्या दुर्घटनेनंतर अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये मार्गाचा गुन्हा दाखल झाला आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशनमार्फत आगीच्या दुर्घटनेचा तपास सुरू आहे. आता पोलीस काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in