• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jahnavi Killekar : जान्हवीने किल्लेकर हिने 4 महिन्यात कसं घटवलं तब्बल 43 किलो वजन? सांगितले खास टिप्स

September 4, 2026 by admin Leave a Comment


Jahnavi Killekar : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘बिग बॉस’नंतर जान्हवीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे. पण आता जान्हवी तिच्या कोणत्या प्रोजेक्ट किंवा भूमिकेमुळे चर्चेत आली नाही, तर अभिनेत्री तिच्या लाईफस्टाईल आणि वाढलेल्या वजनावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिची चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवी हिने मोठं वक्तव्य केलं आहे.

जान्हवी किल्लेकरने नुकतीच सोनाली खरेच्या वॉव विथ सोनाली या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःचं वजन कसं कमी केलं? यावर मोठं वक्तव्य केलं आहे. जान्हवी म्हणाली, ‘प्रेग्नेंट असल्यानंतर आपण जास्त प्रमाणात तूप आणि तूपापासून बनवलेले पदार्थ खातो. कारण ती बाळाची गरज असते… अशाच त्या काळात आपण जाड झालेलो असते. प्रेग्नेंसी फॅट कमी करणं देखील फार मोठा टास्क असतो.’

जान्हवी पुढे म्हणाली, ‘माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली नव्हती. माझं सी – सेक्शन झालं होतं. प्रसुतीनंतर पाच – सहा महिने मी फक्त तुपाचे पदार्थ खाल्ले. पण त्यानंतर मी विचार केला की, आता स्वतःकडे लक्ष द्यावच लागेल… कारण आपल्या फिल्डची ती गरज आहे. अखेर सुरुवात मी धावण्यापासून केली. पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही. फक्त धवल्यामुळे फॅट कमी होऊ शकत नाही.’

‘वजन कमी करण्यासाठी योगा, पॉवर योगा, झुंबा, ॲरोबिक्स चांगले पर्याय आहेत. मी या सगळ्या गोष्ट केल्या आहेत. सात दिवस वेगवेगळे व्यायाम प्रकार करायचे… त्यानंतर मी जीम देखील केलं. मी आता आजिबात गोड खात नाही. मला गुलाबजामुन, काजूकतली खूप आवडते. आपण एक गुलाबजामून खातो, पण त्याचा पश्चात्ताप मनात राहतो. त्यामुळे मी खातच नाही. सारख खाल्ल्यामुळे आपण फिट राहतो.. एवढंच नाही तर, तुमचा चेहरा देखील उजळतो…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे.

जान्हवी हिच्याबद्दल सांगायचं  झालं तर, अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये दमदार  भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर जान्हवी कायम सक्रिय  असते. चाहत्यांच्या संपर्कात  राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ  सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • S Jaishankar : रशियन तेल खरेदीवर युक्रेनी पत्रकाराचा प्रश्न, जयशंकर यांनी दिलं तर्कशुद्ध बोलती बंद करणारं उत्तर
  • 50 लाखांचं बजेट, कमाई 100 कोटी पार; ‘हनुमान अंश’अंश’सारखाच ठरला सुपरहिट!
  • UNICEF च्या रिपोर्टने खळबळ, कोट्यवधी मुलं इंटरनेटवर जे पाहायातेय ते अतिशय धक्कादायक, रिपोर्ट समोर
  • Manoj Jarange: 58 लाख कुणबी प्रमाणपत्रावरून रणसंग्राम, जरांगे उपोषण कधी मागे घेणार? मोठी अपडेट समोर
  • नेपाळच्या संकटातही माणुसकी धर्म जपला; बचाव पथकाने नागरिकाला दिला आयुष्याचा मोठा आधार, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in