• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

नेपाळच्या संकटातही माणुसकी धर्म जपला; बचाव पथकाने नागरिकाला दिला आयुष्याचा मोठा आधार, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

September 4, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी झालेल्या महापुराने सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या भयंकर पुरात शेकडो नागरिक बेपत्ता झाले आहेत. अनेकांनी कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. अनेकांची घरे देखील मातीच्या घरात ढिगाऱ्यात दबली आहेत. पुरामुळे अनेक जण रस्त्यावर आले आहेत. नेपाळमधील हजारो जणांनी घरातील सोने-मौल्यवान वस्तू सोडून जीव वाचवला. नेपाळच्या या भयंकर पुराने जगाचे लक्ष वेधलं आहे. याचदरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या पुरात हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. नेपाळमधील पुरामुळे 1 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर बचाव पथकाने आतापर्यंत 12000 हून अधिक जणांचा जीव वाचवला आहे. अद्याप 5 हजारांहून अधिक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव पथकाच्या जवानांकडून दिवस-रात्र मदतकार्य सुरू आहे. या नेपाळमध्ये पुरामुळे सर्व उद्ध्वस्त झालं असताना पथकाच्या जवानाने एका पीडित नागरिकाला केलेल्या एका मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

Nepal में आई बाढ़ और तबाही के बीच इंसानियत की एक खूबसूरत मिशाल!❣🙏

Nepal में बाढ़ में दबे समान की खुदाई के दौरान एक पर्स से लाखों रुपये मिले।

Ground Lavel पर काम कर रहीं Team ने पूरी रकम घर के मालिक को सकुशल सौंप दी।❤

दुःख और तबाही के बीच जब चेहरे पर अचानक खुशी दिखाई दे तो… pic.twitter.com/hJ5KcXOAD0

— Pintu Singh (@pintusi11376418) September 3, 2026

बचाव पथकाने हरवलेलं पैशांचं पाकीट शोधून दिलं 

नेपाळमध्ये बचाव पथक हजारो जणांना मदत करत आहेत. या मदतकार्यादरम्यान एका नेपाळी नागरिकाला हरवलेली पैशांचं पाकीट शोधून दिलं. त्यांनी पीडित नागरिकाला लाखो रुपयांनी भररेले पैशांचं पाकिट प्रामाणिकपणे शोधून दिलं. पीडित नागरिकाचं घर मातीखाली दबून गेलं आहे. पथकाने मदत केल्यानंतर पीडित नागरिकाचा चेहरा आनंदाने फुलला. पथकाच्या जवानाने संकटातही माणुसकीचा धर्म जपला. आभाळाएवढ्या संकटात लाखमोलाची मदत मिळाल्यानंतर नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रामाणिकपणे पैशांचं पाकीट दिल्याने लोक बचाव पथकाचं कौतुक करत आहे. सोशल मीडियावर एका युजरने म्हटले की, ‘नेपाळमधील पुरामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात बचाव पथकाच्या प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. पथकाच्या जवानाने पर्समधील लाखो रुपये मूळ मालकाला पुन्हा दिले. संकटाच्या काळातही चांगली लोक अस्तित्वात आहेत’. सोशल मीडियावर अनेकांनी या बचाव पथकाच्या जवानांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला, 25 सैनिकांचा खात्मा; कुणी घेतली जबाबदारी?
  • Vidyanand Bapat: विद्यानंद बापट एकटे नाहीत, पुणेकरांचा मोठा पाठिंबा, रविवारी DJ विरोधात धडकणार, अपडेट काय?
  • घरी भगवान कृष्णाची आवडती बासरी ठेवताय? जाणून घ्या होणारे फायदे…
  • हिंदू धर्म विसरल्या का?, मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांना सुनावलं; नेमकं काय आहे प्रकरण?
  • राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची किल्ल्याहून तीन लेकऱ्यांसह उडी, कुटुंबियांचा थरकाप उडवणारा दावा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in