• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट एकटे नाहीत, पुणेकरांचा मोठा पाठिंबा, रविवारी DJ विरोधात धडकणार, अपडेट काय?

September 4, 2026 by admin Leave a Comment


DJ आणि लाऊडस्पीकरवरील गोंगाटाविरोधात पुण्यातील विद्यानंद बापट या सामान्य नागरिकांच्या बोलक्या लढ्याला आता पुणेकरांचे बळ मिळाले आहे. काल ते टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत असताना, त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुणेकरांनी त्यांच्या बाजूने आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या मारहाणीविरोधात राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी निषेध केला. पण काही सामाजिक भान असलेल्या पुणेकरांनी कृतीतून त्यांच्या विचारांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. पुण्यात रविवारी नागरिक डीजे मुक्तीसाठी मोर्चा काढणार आहेत.

रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात रविवारी डीजे मुक्तीसाठी पुणे महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सावंत यांनी बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. डीजे विरोधात आंदोलन जाहरी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रविवारी सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौकात, झाशीची राणी पुतळ्याजवळ एकत्र येऊन पुणेकर डीजे मुक्तीविरोधात आवाज बुलंद करणार आहेत. सावंत यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे पुणेकरांना मोठे आवाहन केले आहे.

बापट यांना पाठिंबा

विद्यानंद बापट यांच्या भूमिकेचे अनेक पुणेकरांनी समर्थन केले आहे. तर सावंत यांनी सुद्धा व्हिडिओ शेअर करत बापट यांना पाठिंबा जाहीर केला. बापट यांच्या मताशी सहमत असल्याचे आणि त्यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. टिळक रोड परिसरात काल बापट यांना संतोष चव्हाण या तरुणाने मारहाण केली होती. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर टीव्ही 9 चे कॅमेरामन आणि इतर पत्रकारांनी बापट यांचा बचाव केला. चव्हाण याला रोखण्याचा प्रयत्न केला.

सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला केल्याची प्रतिक्रिया बापट यांनी दिली होती. तसेच त्यांनी लढा सुरूच ठेवण्याचे स्पष्ट केले होते. त्यांना झालेल्या मारहाणीचा राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील अनेकांनी निषेध व्यक्त केला. त्यांनी हल्लेखोरावर कडक कारवाईची मागणी केली. तर काहींनी बापट यांच्या भूमिकेचे समर्थन केले. आता पुणेकर सुद्धा डीजेमुक्तीसाठी एकवटल्याचे दिसून येते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्यात हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट यांची मोठी घोषणा, मारहाणीनंतर पहिल्यांदा आले समोर
  • कुस्ती खेळाडू अश्विनी पौळ यांच्या आयुष्यात तीन महिन्यांपासून मोठे वादळ, नवऱ्याच्या..
  • अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
  • Nagpur DJ Ban : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भाजपचा शहराध्यक्ष म्हणतो ‘आम्ही डीजे वाजवणारचं’
  • CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in