
सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात हल्ला झाल्यानंतर राज्यभरात अनेकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विद्यानंद बापट हे करत असलेले डिजे बंदीची मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे. परंतु काल विद्यानंद बापट यांना गणेश मंडळाच्या माजी अध्यक्ष संतोष चव्हाण याने मारहाण केली. या मारहाणीनंतर पोलिसांनी त्यांना 24 तास पोलीस सुरक्षा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर रविवारी त्यांच्या हल्ल्याच्या विरोधात काही नागरिकांकडून मोर्चा काढला जाणार आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर आता या मागणीसाठी संघटनात्मक स्वरुप द्यायचं आहे, अशी घोषणा बापट यांनी केली. त्यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात मारहाण झाल्यानंतर विद्यानंद बापट पहिल्यांदा माध्यमांसमोर आले. विद्यानंद बापट म्हणाले, ‘मला माझं व्यक्तिमहत्व वाढवायचं नाही. माझे मुद्दे पुढे नेत असेल, तर ते मला महत्वाचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी म्हटलं आहे. व्यक्तिमहत्व वाढवणे घातक असते. तुम्ही व्यक्तिगत पातळीवर करत असाल, तर तुमचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून मान्य करेल. परंतु मी स्वत: प्रोत्साहन देणार नाही’.
Leave a Reply