
PCB To Investigate Imam-Ul-Haq Injury: पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका 0-2 ने गमावली आहे. दुसऱ्या कसोटी सामना लॉर्ड्सवर पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा 194 धावांनी पराभव झाला आणि मालिका हातून गेली. असं असताना या सामन्यात इमाम उल हकची दुखापत चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्याच्या दुखापतीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला संशय आहे. त्यामुळे त्याच्या दुखापतीच्या चौकशीचे आदेश पीसीबीने दिले आहेत. पाकिस्तानी मिडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी सामना करण्यास इमाम उल हक अकार्यक्षम होता. त्यामुळे त्याने फेक इंज्युरीचा बनाव रचला, असं त्यात सांगितलं गेलं आहे. आता तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला पाकिस्तान पाठवण्याचे आदेश दिले गेले आहेत. इतकंच काय तर फॉर्मात नसलेल्या विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानलाही पाकिस्तानात पाठवलं जाणार आहे.
लॉर्ड्सच्या दोन्ही डावात फलंदाजी केली नाही
इंग्लंडने दुसर्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 290 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने अक्षरश: नांगी टाकली आणि 110 धावांवर संघ बाद झाला. खरं तर संघ अडचणीत असताना इमाम उल हक मैदानात उतरणं अपेक्षित होतं. पण फलंदाजीला उतरला नाही. इंग्लंडने पहिल्या डावात 180 धावांची आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या डावात 208 धावा केल्या. त्यामुळे 388 धावांचं टार्गेट पाकिस्तानसमोर होतं. पाकिस्तानचा संघ 194 धावांवर बाद झाला. हा सामना पाकिस्तानने 194 धावांनी गमावला. पण दुसऱ्या डावातही इमाम उल हक दुखापतीचं कारण सांगून मैदानात उतरला नाही.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात इमाम उल हक प्लेइंग 11 चा भाग होता. तेव्हा फिल्डिंग करताना त्याच्या डाव्या बाजूच्या पोटरीला दुखापत झाल्याची तक्रार केली होती. पण स्कॅनमध्ये ही दुखापत किरकोळ असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना बनाव रचल्याचा आरोप पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू आणि मीडियाने केला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याच्या दुखापतीची चौकशी करणार आहे. कारण इमाम उलने असं पहिल्यांदाच केलं असं नाही.
मार्च 2025 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील एका सामन्यात असंच घडलं होतं. पायाच्या बोटात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. पण एक्स रे मध्ये कोणताही फ्रॅक्चर किंवा दुखापत झाली नसल्याचं दिसलं. इतकंच काय तर वैद्यकीय अहवालात त्याचा बनाव उघड झाला होता. त्याच्या बोटातून काढलेला पदार्थ खरं रक्त नसून शाई किंवा एक होता. इतकंच काय तर संघातील इतर सदस्यांनी हा बनाव होता असं सांगत, कॅमेऱ्यासमोर लंगडत चालायचा आणि त्यानंतर व्यवस्थित असायचा.
Leave a Reply