• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Duleep Trophy उपांत्य फेरीतील पहिल्या डावात ईस्ट आणि सेंट्रल झोन 266 धावांवरच बाद, सामना ड्रॉ झाला तर निकाल काय? जाणून घ्या

August 31, 2026 by admin Leave a Comment

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. दोन्ही संघांनी पहिल्या डावात सारख्याच 266 धावा केल्या. सेंट्रल झोनने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ईस्ट झोन संघही 266 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे हा सामना ड्रॉ झाला तर निकाल कसा दिला जाईल? कारण पहिल्या डावात आघाडी घेतलेल्या संघाला विजयी घोषित केलं जातं. पण या सामन्यात स्थिती काही वेगळी आहे. कारण दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल कोणत्या आधारावर दिला जाईल. तसेच अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळेल हा प्रश्न आहे. तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील, तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

… तर असा विजेता ठरवला जाईल

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या नियमानुसार, हा सामना ड्रॉ झाला तर दुसऱ्या डावातील कामगिरीच्या आधारे विजेता घोषित केला जाईल. पहिल्या डावात दोन्ही संघांनी 266 धावा केल्या आहे. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीचा नियम येथे लागू होणार नाही. सामना ड्रॉ झाल्यास दुसऱ्या डावात ज्या संघाने सर्वाधिक धावा केल्या आहेत . त्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. तसेच त्याला पुढच्या फेरीचं तिकीट मिळेल.

दुसऱ्या डावात सेंट्रल झोन फलंदाजी करत आहे. जर उर्वरित सर्व दिवस सेंट्रल झोनने फलंदाजी केली आणि ईस्ट झोनला बॅटिंग दिलीच नाही तर सेंट्रल झोन विजयी घोषित केला जाईल. या सामन्यात ईस्ट झोनपेक्षा एक धाव जरी जास्त तर सेंट्रल झोनला विजयी घोषित केलं जाईल. कारण सामना ड्रॉ झाला तरी सेंट्रल झोनकडे आघाडी असेल. त्यामुळे ईस्ट झोनला दुसऱ्या डावात फलंदाजी मिळेपर्यंत हा सामना पूर्णपणे सेंट्रल झोनच्या पारड्यात झुकलेला असेल.

समजा, दुसऱ्या डावात पावसामुळे व्यत्यय आला असता आणि एकही चेंडू टाकला नसता, तर विजयी कोण? हा प्रश्नही अनेकांना पडला होता. जर अशी स्थिती ओढावली असती तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजयी घोषित केलं असतं. पण या सामन्यात तशी काही स्थिती नाही. कारण सेंट्रल झोनने 3 गडी गमवून 38 धावा केल्या आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CM Devendra Fadnavis | ‘PM Modi 2029ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाहीत’-फडणवीस
  • गुलाबी साडीमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या सौंदर्याने लावलंय सर्वांना वेड, सर्वत्र होतंय कौतुक
  • राहुल गांधींचे 29 मुद्दे खोटे, फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाबाबत नेमकं काय म्हणाले?
  • Photo : कागदं फेकले, कांद्याचा ट्रे फेकला, अमित ठाकरेंचा संताप पाहिलात का? पुण्याच्या कॉलेजात फुल्ल राडा!
  • अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, काय म्हणाले सरन्यायाधीश ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in