• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, काय म्हणाले सरन्यायाधीश ?

August 31, 2026 by admin Leave a Comment


अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली कॉक्रोच जनता पार्टीच्या ५ सप्टेंबरच्या रॅलीला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या रॅलीच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. भारताचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांच्या समोर या याचिकेची सुनावणी झाली. सीजेपीने केंद्र सरकारवर २५ जुलै रोजी जंतरमंतर आंदोलनावेळी दिलेले आश्वासन पाळलेले नसल्याने सीजेपीने पुन्हा दिल्लीत येत्या ५ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

बातमीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्यकांत म्हणाले की असे मानण्यास ठोस कारण नाही की कोणती अप्रिय घटना होईल. वास्तविक याचिकेद्वारे BRICS शिखर परिषदत पूर्ण होईपर्यंत प्रस्तावित निदर्शनांना रोखण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.आणि विशेष म्हणजे हे शिखर संमेलन १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आहे. तर सीजेपीची निदर्शने ५ सप्टेंबर रोजी आहेत.

काय म्हणाले सरन्यायाधीश सुर्यकांत ?

या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सुर्यकांत म्हणाले की अधिकाऱ्यांकडून कायदा आणि सुववस्था राखण्याची आशा व्यक्त केली जा असते. ते म्हणाले की सर्व पक्ष शांततापूर्ण आणि जबाबदारीने काम करत असून कायद्याने बांधिल आहेत.

CJP चा प्लान काय ?

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत ५ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा सोमवारी केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सरकारवर आरोप केला आहे की त्यांनी २५ जुलै रोजी दिलेली आश्वसनाना पूर्ण केलेले नाही. ज्याच्या आधारे परीक्षेतील घडबडीविरोधात सीजेपीने त्यांचे ३६ दिवसांचे जंतरमंतर वरील आमरण उपोषण मागे घेतले होते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी काढण्यात येणारा हा मार्च इंडिया गेट पासून सुरु होईल दिल्ली पोलिस मुख्यालयापर्यत चालणार आहे.

नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर फेर नीट परीक्षा घेण्याच्या निर्णयाने ज्या पालकांच्या पाल्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबिय दिल्लीतील ५ सप्टेंबरच्या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CM Devendra Fadnavis | ‘PM Modi 2029ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाहीत’-फडणवीस
  • गुलाबी साडीमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या सौंदर्याने लावलंय सर्वांना वेड, सर्वत्र होतंय कौतुक
  • राहुल गांधींचे 29 मुद्दे खोटे, फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाबाबत नेमकं काय म्हणाले?
  • Photo : कागदं फेकले, कांद्याचा ट्रे फेकला, अमित ठाकरेंचा संताप पाहिलात का? पुण्याच्या कॉलेजात फुल्ल राडा!
  • अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, काय म्हणाले सरन्यायाधीश ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in