PM Kisan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता जाहीर केला आहे. या हप्त्याच्या माध्यमातून देशभरातील 9.32 कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एकूण 18,640 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पीएम किसान […]
india
लहान लेकरांचा जीव घेणारा नेतान्याहू जिवंत असेल तर… इराणची थेट मोठी धमकी, मोठी खळबळ..
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पेटला आहे. यादरम्यानच इराण भडकला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असल्याने मोठी खळबळ उडाली. बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांना संबोधित करणारे पंतप्रधान कार्यालयने एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात म्हटले की, नेतान्याहू सुरक्षित आहेत. त्यानंतर, इस्लामिक रिव्होल्यूशनरी कॉर्प्स गार्ड (आयआरजीसी) ने इस्रायलला इशारा दिला […]
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण थेट पुढे, अमेरिकेच्या एजन्सीचा खळबळजनक दावा, थेट म्हटले, पहिल्यापासूनच..
अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील फक्त एकच व्यक्ती जिवंत वाचू शकला. या विमान अपघातात 260 लोकांचा जीव गेला. या विमान अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ देखील पुढे आला. या विमान अपघातानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुरूवातीला थ्रस्टमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले गेले. मात्र, आता या विमान अपघाताबद्दल अत्यंत धक्कादायक […]
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन, अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिलेले ब्लॉकबस्टर सिनेमे
गेल्या दोन – तीन वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आता देखील हिंदी सिनेविश्वातील एक काळ गाजवलेल्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन झालं आहे. ‘सत्ते पे सत्ता’, ‘कर्ज’, ‘विश्वनाथ’ यांसारख्या दमदार सिनेमात भूमिका बजावलेल्या अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. मधू यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मधू यांनी महानायक अमिताभ […]
फक्त एक-दोन की, भारताच्या सगळ्याच जहाजांना हॉर्मुझ पार करण्याची परवानगी? इराणच्या राजदूतांनी खरं काय ते सांगितलं
पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षा दरम्यान काही भारतीय जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे, असं इराणचे भारतातील राजदूत Mohammad Fathali यांनी शनिवारी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून असलेले मैत्रीसंबंध आणि संयुक्त हित डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले. इंडिया टुडे कॉन्क्लेव 2026 मध्ये Mohammad Fathali बोलत होते. सुरुवातीला भारतासोबत संवाद स्थापन करताना […]
NZ vs SA : वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पुन्हा आमनेसामने, दोघांपैकी वरचढ कोण?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता हळुहळु द्विपक्षीय मालिकांना सुरुवात होत आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकणारी बांग्लादेश सुपर 8 मधून बाहेर पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध मायदेशात टी 20i मालिका खेळत आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. या मालिकेचा निकाल हा रविवारी 15 मार्च रोजी तिसऱ्या सामन्यानंतर […]