• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: केकेआरला सीएसके विरुद्धच्या पराभवानंतर दणका, कॅप्टन अजिंक्यवर बीसीसीआयची कारवाई, कारण काय सांगितलं?

April 15, 2026 by admin Leave a Comment


मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 संघांनतर कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेतील तिसरी यशस्वी टीम आहे. केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मात्र 3 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या केकेआरची 19 व्या मोसमात सध्या वाईट वेळ सुरु आहे. केकेआरवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ ओढावली आहे. केकेआरची पहिल्यांदाच 5 सामने खेळल्यानंतरही विजयी खातं न उघडण्याची पहिली वेळ ठरली आहे. केकेआरने आधी 4 पैकी 3 सामने गमावले. त्यामुळे केकेआर 14 एप्रिलला आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडेल, अशी आशा होती. मात्र केकेआरने चेन्नई सुपर किंग्स टीम विरुद्ध पराभवाची मालिका कायम ठेवली. त्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कॅप्टन अजिंक्य रहाणेवर बीसीसीआयची कारवाई

कर्णधार अजिंक्य रहाणे सीएसकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयच्या कारवाईचा शिकार झाला आहे. अजिंक्य स्लो ओव्हर रेट कायम राखू न शकल्याने त्याला बीसीसीआयच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून अजिंक्यवर दंडात्मक कारवाई करण्याची आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजिंक्यला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अजिंक्य आतापर्यंत 19 व्या मोसमात ओव्हर रेट कायम न राखणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. या मोसमात सर्वातआधी अशी चूक पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्याकडून झाली होती. गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल यानेही तशीच चूक केली. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा देखील स्लो ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी ठरला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या अशी चूक करणारा चौथा कॅप्टन ठरला. आता अजिंक्य रहाणे याने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

केकेआरचा संघर्ष

केकेआरला 19 व्या मोसमात आतापर्यंत संघर्ष करावा लागला आहे. केकेआरच्या गोटात विस्फोटक फलंदाज आहेत. मात्र काहींना अजून चमक दाखवता आलेली नाही. तर काही फलंदाजांना मोठी खेळी करता येत नाहीय. तर गोलंदाजीतही अनुभवाचा अंदाज दिसत आहेत.

केकेआरचा 32 धावांनी धुव्वा

दरम्यान सीएसकेने मंगळवारी 14 एप्रिलला केकेआरवर 32 धावांनी मात केली. सीएसकेने केकेआरसमोर 193 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र केकेआरला 7 विकेट्स गमावून 160 रॅन्सपर्यंतच पोहचता आलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देऊळ बंद 2मधून चाहत्यांना मोठं सरप्राईज, थेट प्रविण तरडेंची बायको महत्त्वाच्या भूमिकेत
  • परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात तडकाफडकी मोठा निर्णय, सगळा कांड बाहेर…पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये!
  • IMD Weather Update : गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाचा महाराष्ट्राला हादरवणारा इशारा, या भागामध्ये सुट्टी जाहीर
  • अखेर भारताला सर्वात मोठं गिफ्ट, होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गुड न्यूज, थेट घोषणाच केली
  • IMD Weather Forecast : गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाचा महाराष्ट्राला हादरवणारा इशारा, या भागामध्ये सुट्टी जाहीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in