शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे, यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. 1999 मध्ये शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नव्हता, असा मुद्दा निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आल्याचे सिब्बल यांनी सांगितले. […]
Archives for August 2026
छत्रपती संभाजीनगरमध्ये उपवर्गीकरणा विरोधात एल्गार, आंदोलकांच्या मागण्या काय?
अनुसूचित जातीच्या प्रस्तावित आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचंड मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. उपवर्गीकरण रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू […]
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
मुख्यमंत्रीपदी शिंदेंची निवड बेकायदेशीर. कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा आज सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते आणि ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे. सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, […]
Urmila Matondkar : पूर्व पतीने दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरचा खोचक टोला; ‘मला प्रेम, निष्ठा..’
Urmila Matondkar: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तरने नुकतंच दुसरं लग्न केलं. निधा भट्टशी त्याने निकाह केला असून त्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिसेप्शनच्या या फोटोंसह मोहसिनने पत्नी निधासाठी रोमँटिक संदेशसुद्धा लिहिला आहे. निधा ही माझी केवळ पत्नी नसून ती माझं घर आणि शांती आहे, अशा शब्दांत त्याने प्रेम व्यक्त केलं […]
रिल्सच्या जमान्यात शॉर्टकट वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Gen-Z ला कानमंत्र
सध्या रिल्सचा जमाना आहे. सोशल मीडियावरील इन्फ्ल्युएंसर्सला तरुण आकर्षित होतात. कोणत्याही मार्गाने जातात. पण रिल्सच्या जमान्यात शॉर्टकटचा मार्ग अवलंबू नका. तुम्हाला आवडत्या व्यक्तींचें आत्मचरित्र वाचा. त्यातून तुमच्यासमोर इतिहासाचा एक कालखंड उलगडला जातो, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gen-Zला दिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रिम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स’ […]
Youtube New Policy: युट्युबवरुन पैसे कमवणं होणार अधिक अवघड, नव्या पॉलिसीमुळे क्रिएटर चिंतेत
यूट्यूब क्रिएटर्ससाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. यूट्यूबने आपल्या यूट्यूब पार्टनर प्रोग्रामद्वारे जाहिराती आणि यूट्यूब प्रीमियममधून मिळणाऱ्या महसुलाच्या वाटपाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हा निर्णय व्हिडिओ आणि शॉर्ट्ससारख्या कंटेंटद्वारे पैसे कमवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी एक मोठा धक्का असेल. 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांनुसार, पात्रतेचे निकष दुप्पट करण्यात आले आहेत. यूट्यूबच्या […]