• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Urmila Matondkar : पूर्व पतीने दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरचा खोचक टोला; ‘मला प्रेम, निष्ठा..’

August 12, 2026 by admin Leave a Comment


Urmila Matondkar: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तरने नुकतंच दुसरं लग्न केलं. निधा भट्टशी त्याने निकाह केला असून त्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिसेप्शनच्या या फोटोंसह मोहसिनने पत्नी निधासाठी रोमँटिक संदेशसुद्धा लिहिला आहे. निधा ही माझी केवळ पत्नी नसून ती माझं घर आणि शांती आहे, अशा शब्दांत त्याने प्रेम व्यक्त केलं आहे. एकीकडे मोहसिनची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली असतानाच उर्मिलाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये प्रेम, निष्ठा आणि वेळेचं मूल्य यांबद्दलचा एक संदेश आहे. त्यामुळे उर्मिलाने या ‘क्रिप्टिक’ पोस्टद्वारे पूर्व पती मोहसिनला टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे.

मोहसिनने यावर्षी जूनमध्ये पहिल्यांदा त्याच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली होती. त्यावेळी त्याने आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्याबद्दल आणि निधासोबत एका नवीन अध्यायाची सुरुवात करण्याबद्दल एक भावनिक मेसेज शेअर केला होता. आता लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘तू माझी फक्त पत्नी झाली नाहीस, तर तू माझं घर, माझी शांती आणि माझ्या प्रत्येक दिवसाचा आवडता भाग बनली आहेस. तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी अल्लाहचा आभारी आहे. मी वचन देतो की आपल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझा आदर करेन, तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि तुझ्यावर प्रेम करेन.’

मोहसिनने पोस्ट केले पत्नीसोबतचे फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohsin Akhtar (@mohsinakh)

उर्मिलाची पोस्ट-

मोहसिनच्या या पोस्टदरम्यान उर्मिला मातोंडकरने तिच्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे, ‘मला प्रेम, निष्ठा आणि वेळ यांसारख्या मौल्यवान गोष्टी आवडतात.’ या पोस्टद्वारे तिने मोहसिनला अप्रत्यक्ष टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे. उर्मिलाने काश्मिरी बिझनेसमन मोहसिन अख्तरशी 4 फेब्रुवारी 2016 रोजी एका खाजगी समारंभात लग्न केलं होतं. आंतरधर्मीय आणि वयातील दहा वर्षांच्या फरकामुळे त्यावेळी हे लग्न चर्चेत आलं होतं. 2014 मध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात या दोघांची पहिली भेट झाली होती. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. 2024 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर मोहसिनने दुसरं लग्न केलं आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in