
छत्रपती संभाजीनगरमधील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. कुणालने खवड्या डोंगरावर जाऊन खाली उडी मारण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी आले आणि दोघांचा तोल जाऊन ते दरीत कोसळले. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूमुळे धक्का बसल्याने कुणालच्या आईनेही दरीत उडी मारून जीवन संपवले. या तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता कुणाल डोंगरावर असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी दरीत उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने अंगावर काटा आणणारी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
खाली पडताच हात पाय…
कुणालला वाचवण्यासाठी दरीत उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘मुलगा आणि वडील सोबतच खाली पडले, त्यानंतर काही क्षणात आईही खाली पडली. माझ्या हाताला आईचा पाय लागला आणि माझ्या पायाच्या बोटाला तिचा गुडघा लागला, त्यामुळे माझं बोट सुजलेलं होतं. ही घटना आम्हाला खुप भयानक वाटली. खाली पडताच त्यांचे हात आणि पाय खिळखिळे झाले. ते जसे खाली पडले तसे मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला.’
डोक्याचे पार्ट इकडे-तिकडे…
पुढे बोलताना या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘अॅम्बुलन्स बोलवा असा आवाज माझ्या तोंडातून निघाला. मात्र पण त्यांच्या तोंडून आवाजही नाही निघाला आणि त्यांनी कोणतीही हालचालही नाही केली. त्यांचा जागीच प्राण गेला. त्यांच्या डोक्याचे पार्ट इकडे तिकडे आणि आमच्या अंगावर उडाले. पण ते हलले पण नाहीत. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. आम्हाला खूप वाईट वाटलं. 45 वर्षांमध्ये मी अनेक अपघात पाहिले, पण हा सर्वात भयानक अपघात होता.’
कुणालच्या मित्रांनी काय म्हटले?
कुणालच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रांना धक्का बसला आहे. त्यांच्या मित्रांनी सांगितले की, ‘तो असं करेल असं वाटलंच नव्हतं, कुणाल अत्यंत संस्कारी आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. कुणाल क्लासला असायचा, तसेच तो अभ्यासात हुशार आणि चांगले मार्क मिळवणारा विद्यार्थी होता. कुणालने कधीही कोणतीही अडचण किंवा तणाव मित्रांसमोर बोलून दाखवला नाही. आयफोन हे कुणालच्या मृत्यूचं कारण नव्हतं, नेमकं कारण आम्हाला माहिती नाही असं विधान त्याचा मित्र हर्षद गावंडे याने केलं आहे.
Leave a Reply