• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा

August 12, 2026 by admin Leave a Comment


मुख्यमंत्रीपदी शिंदेंची निवड बेकायदेशीर. कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा आज सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते आणि ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे. सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. संजय रावतांचा निशाणा. तर ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला व्हिलन ठरवण्याचं काम सुरू. नरेश म्हस्केंची टीका. राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय रावतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा खळबळजनक आरोप. तर एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्केंनी केल्या होत्या. शिंदे ठाण्यामध्ये भ्रष्टाचार करतायेत असं म्हस्के म्हणायचे. रावतांचाही निशाणा. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतनं प्रवास. जलसंधारणाच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतनं प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक संपन्न. अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची आठ खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांसंदर्भातही पवारांकडून विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. तर भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यामध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना. पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार यासंदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. NEET विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सभागृहामध्ये चर्चा होणार. गृहमंत्री अमित शाहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. तर अमित शाहांचं लेक्चर ऐकण्यात तरुणांना रस नाही. पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले हे सांगा. विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश शहांनी दिलेत असल्यास राजीनामा द्यावा. राहुल गांधी आक्रमक. अमित शाह संसदेत चर्चेला तयार पण विरोधकांना राजकारण करायचंय. शाह काँग्रेसला उघडं पाडतील याची विरोधकांना भीती. उपमुख्यमंत्री शिंदेंचा घर निशाणा. तर अमित शाह संसदेतनं का पळतायत? शाहानी संसदेत येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी. पॅलेट गनच्या गोळीबाराचे आदेश शहांचेच होते. सीजेपीच्या अभिजीत दीपकेचा आरोप. दरम्यान जंतरमंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. सोशल मीडियावरील प्रश्नांवर कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेचं सूचक विधान. मुंबईमध्ये आमदार निवास छताचा स्लॅब कोसळला. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानातील ही घटना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित. मुंबईच्या ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घर नाही. ब्रोकरच्या जाहिरातीवर सोशल मीडियावर टिकेची झोड. मराठी माणसांमध्ये संतापाची लाट. व्हेज नॉनव्हेज वरून पुन्हा वाद चिघळणार. मराठीच्या मुद्द्यावरून परमिट रद्द केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. वेळप्रसंगी कोर्टातही जाऊ. भाजपचे शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत यांचा हा इशारा. प्रशासनाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in