भारत आणि यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम टी20 सामना बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळला जाईल. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा ‘करा किंवा मरा’ सामना आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकण्यात अपयशी ठरला, तर आयर्लंडसारख्या संघाविरुद्ध टी20 मालिका गमावण्याची मोठी नामुष्की त्यांच्यावर ओढवेल. सध्या, दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंड […]
Archives for June 2026
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये…
मुंबईत पुन्हा एकदा लोकल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेतील मयंक लोहार हत्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच माहिम परिसरात चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास माहिम रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. लोअर परळ येथील खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करणारे नवीन प्रसाद […]
माझ्याकडून मोठी चूक झालेली..; चोराच्या चाकूहल्ल्याच्या घटनेवर अखेर सैफची कबुली
जानेवारी 2025 मध्ये अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील घरात घुसून एका चोराने चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. या घटनेविषयी सैफने विविध मुलाखतींमध्ये बरंच काही सांगितलं होतं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने त्याच्याकडून एक चूक झाल्याचं कबूल केलं. त्याचप्रमाणे हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याचा तपशील सांगितला […]
सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन केला, पहिला धक्कादायक फोटो पुढे, लोहगड बंद..
केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकराच्या मदतीने केतनची हत्या केली. सुरूवातीला हा अपघात असल्याचे दर्शवण्यात आले. जसा जसा पोलिस तपास पुढे गेला, तशी धक्कादायक गुपिते उघड होत आहेत. केतन सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरला, असे सियाने सांगितले होते. मात्र, सियाने आपला प्रियकर चेतन चाैधरी […]
IND vs IRE: 50 नाही तर फक्त 49 धावा, अभिषेक शर्माने पहिल्या टी-20 मॅचमध्ये अर्धशतक झळकावून पण आयसीसीने एक धावा केली बाद; नियम काय?
भारत आणि आयर्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला जो भारतीय संघाने गमावला. दुसरा टी-20 सामना हा आज रंगणार आहे. मालिका जिंकता येणार नसली तरीही भारतीय संघासमोर आता मालिका वाचवण्याचे आव्हान असणार आहे. मालिका वाचवण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे प्रदर्शन […]
Tukaram Mundhe: बाहेर जाऊन धाडी टाकण्यापेक्षा… आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना दाखवला आरसा, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
MLA Abhijit Patil on Tukaram Mundhe: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून धडाधड कारवाया सुरू आहेत. भेसळ आणि भेसळखोरांविरोधात त्यांनी कायद्याचा बडगा उगारल्याने जनतेकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यांशी खेळणाऱ्यांविरोधात ते धाडसी कारवाई करत असल्याने अनेकांनी त्यांची आता बदली करू नका अशी सरकारकडे मागणी केली आहे. […]