• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये…

June 28, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत पुन्हा एकदा लोकल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेतील मयंक लोहार हत्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच माहिम परिसरात चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास माहिम रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

लोअर परळ येथील खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करणारे नवीन प्रसाद हे कामावरून घरी परतत होते. यावेळी स्टेशन परिसरात एका अनोळखी व्यक्तीला चुकून धक्का लागला. धक्क्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल खाली पडला. मात्र मोबाईल सुरक्षित असल्याचे दिसूनही आरोपीने नवीन प्रसाद यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद वाढत असल्याचे पाहून नवीन तेथून निघून गेले. मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग करत सेनापती बापट मार्गावर त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी CSMT स्थानकावरही एका व्यक्तीने कोयता उगारल्याची घटना घडली होती. त्यामुळे मुंबई लोकल आणि स्टेशन परिसरातील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमित साटम यांची मुंबई महापौर रितू तावडे आणि पालिका अधिकाऱ्यांना सक्त ताकीद
  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in