
चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझीला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवण्यात महेंद्रसिंह धोनीचा मोलाचा हातभार आहे. पण महेंद्रसिंह धोनीची एक मागणी मात्र मान्य करण्यास चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापन तयार नाही. त्यामुळे धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वादाला फोडणी मिळाली आहे. (PC-PTI)
रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्समध्ये भागीदारी घेऊ इच्छित आहे. त्याने चेन्नईच्या व्यवस्थापनासमोर 25 टक्के भागीदारीची मागणी केली. पण चेन्नई सुपर किंग्सने फक्त तीन टक्के भागीदारी देण्याचं मान्य केलं. (PC-PTI)
महेंद्रसिंह धोनीने आपली मागणी करत 20 टक्क्यांवर आणली, तर मॅनेजमेंट फक्त 4 टक्क्यांवर अडून राहिली. महेंद्रसिंह धोनीने शेवटची 18 टक्क्यांची भागीदारीची अट समोर ठेवली. पण चेन्नई सुपर किंग्सने ही ऑफर धुडकावून लावली आणि फार फार तर 5.5 टक्के भागीदारी मिळेल असं सांगितलं. (PC-PTI)
क्रिकब्लॉगरच्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात यावरून बिनसल्याची चर्चा आहे. त्यामुळे धोनी चेन्नई सुपर किंग्ससोबत पुढच्या पर्वात असेल की नाही याबाबत साशंकता आहे. (PC-PTI)
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने एक दोन नाही तर पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. 2008 पासून धोनीने संघाचं नेतृत्व केलं होतं. (PC-PTI)




Leave a Reply