• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल

August 25, 2026 by admin Leave a Comment


भारतासह जगभरातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशातच आता भारतात काम करणाऱ्या महिलांबाबत एक अहवाल समोर आला आहे. एका बाजूला देशातील एकूण महिला श्रमशक्ती सहभाग दरात (LFPR) मोठी सुधारणा झाली आहे, तर दुसरीकडे विविध धर्मांमध्ये महिलांच्या रोजगारातील फरकही समोर आला आहे. सामाजिक रूढी, आर्थिक परिस्थिती, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांचा महिलांच्या काम करण्याच्या निर्णयावर मोठा परिणाम होतो. PLFS 2023-24 आणि NFHS वर आधारित संशोधनातून याची माहिती समोर येते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतात किती महिला काम करतात?

पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) 2023-24 हा भारतातील रोजगाराशी संबंधित अधिकृत आणि महत्त्वाचा डेटा आहे. हा अहवाल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून प्रसिद्ध केला जातो. या अहवालानुसार, 2023-24 मध्ये भारतातील महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर (LFPR) 41.7 टक्के होता. म्हणजेच 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक 100 महिलांपैकी सुमारे 42 महिला एकतर काम करत आहेत किंवा कामाच्या शोधात आहेत. तुलनेत पुरुषांचा LFPR 78.8 टक्के आहे. म्हणजेच महिला आणि पुरुषांच्या श्रमशक्ती सहभागामध्ये अजूनही मोठी तफावत आहे.

महिला रोजगाराच्या बाबतीत सकारात्मक बदलही दिसून आला आहे. 2017-18 मध्ये महिलांचा LFPR केवळ 23.3 टक्के होता. तो 2023-24 मध्ये वाढून 41.7 टक्के झाला. म्हणजेच गेल्या काही वर्षांत महिलांच्या काम करण्याच्या सहभागात मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात तर महिला LFPR 48 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. प्रत्यक्षात काम करणाऱ्या महिलांचा श्रमिक लोकसंख्या प्रमाण (WPR) 40.3 टक्के आहे. तर महिला आणि पुरुषांचा बेरोजगारी दर 3.2 टक्के आहे.

कोणत्या धर्मातील महिला सर्वाधिक काम करतात?

सरकारी PLFS डेटामध्ये धर्माच्या आधारावर LFPRची थेट आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) आणि इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हे (IHDS) यांसारख्या सर्वेक्षणांच्या आकडेवारीतून मोठी बातमी समोर आली आहे. सुजाता कर यांच्या 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात NFHS-4 (2015-16) च्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनानुसार हिंदू महिलांच्या तुलनेत ख्रिश्चन आणि बौद्ध महिलांच्या काम करण्याची आकडेवारी अधिक असल्याचे आढळले. या संशोधनात हिंदू महिलांना तुलनेसाठी आधार मानण्यात आले आहे. मुस्लिम आणि शीख महिलांच्या काम करण्याची शक्यता तुलनेने कमी असल्याचे संशोधनातून समोर आले.

जर धर्माच्या आधारावर साधारण क्रमवारी केली तर ख्रिश्चन आणि बौद्ध महिलांचा कामात सहभाग जास्त आहे. त्यानंतर हिंदू महिलांचा क्रमांक आहे. तसेच मुस्लिम आणि शीख महिलांचा कामात खूप कमी सहभाग असल्याचे समोर आले आहे. रिविव्हू ऑफ सोशल इकॉनॉमी मध्ये 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातही महिला श्रमशक्ती सहभागातील जातीनुसार असलेली तफावत काही प्रमाणात कमी होत असली, तरी धर्माच्या आधारावरील फरक कायम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुस्लिम महिलांचा सहभाग कमी का?

सुजाता कर यांच्या अभ्यासानुसार मुस्लिम महिलांच्या कमी सहभागामागील महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे विवाहानंतर काम करण्याची शक्यता कमी होणे. लग्नानंतर अनेक महिलांचा रोजगारातील सहभाग कमी होतो. याशिवाय मुस्लिम महिला अनेकदा अशा भागांमध्ये राहतात, जिथे आर्थिक आणि रोजगाराच्या संधी तुलनेने कमी असतात. त्यामुळे महिलांना नोकरी किंवा कामाच्या संधी कमी मिळू शकतात.

कुटुंबातील लैंगिक असमानता, महिलांच्या बाहेर जाऊन काम करण्याबाबतच्या सामाजिक धारणा आणि इतर कौटुंबिक कारणांचाही त्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः शहरी भागात मुस्लिम महिलांचा लेबर मार्केटमधील सहभाग हिंदू महिलांच्या तुलनेत कमी असल्याचे काही अभ्यासांमध्ये आढळले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक
  • IND vs SL: सोनलने टीम इंडियाला झुंजवलं! तिसऱ्या दिवशी काय झालं? फॉलोऑनचं गणित सुटणार का?
  • ‘दीदी जिथे, आम्ही तिथे’ बंडखोरांकडे पाठ, हा आमदार ममता बॅनर्जींच्या खेम्यात, सुप्रीम नोटीस, पारडे पलटणार?
  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in