
पीसी मुस्तफा यांचे कुटुंब एकेकाळी दहा रुपये रोजंदारीवर उदरनिर्वाह करत होते. मुस्तफा हा सहावीत नापास झाल्याने वडीलांना हमालीत मदत करु लागला. केरळातील वायनाड कॉफी प्लाटंनेशन येथे तो हमालीचे काम करत असल्याचे पाहून त्याच्या शिक्षकाने मुस्तफाला शिकवण्याचा आग्रह त्याच्या वडीलांकडे धरला आणि त्याच्या पुस्तकाचा खर्चही उचलला. नंतर मुस्तफा याने मागे पाहिले नाही. आज मुस्तफाचा वार्षिक टर्नओव्हर ६८१ कोटी आहे.
मुस्तफा याचे वडिल चौथी फेल आहेत. तर आईने शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. तो सहावीला नापास झाल्याने आई-वडीलांना मदत करु लागला. कॉफीच्या मळ्यातील एका मॅनेजरने मुस्तफाला शिकवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर शाळेत टॉप आला. नंतर त्याने एआयटी कालिकत केले आणि नंतर बंगळुरु येथून आयआयएम केले. त्यानंतर मुस्तफा परदेशात नोकरीला गेला. त्यानंतर त्याने भारतात येऊन स्वत:चा iD Fresh Food स्टार्टअप सुरु केला. त्याचे वार्षिक टर्नओव्हर ६८१ कोटी रुपयांचा आहे.
मुस्तफा ही केरळातील वायनाड जिल्ह्यातील कालपेट्टा येथील चेन्नालोडे येथे मोठा झाला. त्यांचे वडील वेळ चौथी झाले आहेत. आणि ते कॉफीच्या मळ्यात काम करतात. त्याची आई कधीच शाळेत गेलेली नाही. त्यांचे कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट होती. त्यामुळे त्यांचा मोठा मुलगा सहावीत नापास झाल्यानंतर तो वडिलांना हमालीत मदत करु लागला. सहावीत नापास झाल्याने मुस्तफा हा शाळेत का येत नाही याची चौकशी करत त्याचे शिक्षक त्याला शोधत घरी आले.त्यांना मुस्तफाला पुढे शिकवण्याची मागणी त्यांच्या वडिलांकडे केली. त्याच्या पुस्तकाच्या खर्च उचलण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला. त्यानंतर मुस्तफाने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण केलेच. नंतर एनआयटी कालिकत येथून इंजिनियरिंग पूर्ण केले. नंतर आयआयएम बंगलुरु येथून एमबीए केले आहे. त्यानंतर त्याने परदेशात सॉफ्टवेअरिंग इंजिनिअरिंगची नोकरी देखील केली. मात्र, २००५ मध्ये त्याने स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला.
चुलत भावांच्या मदतीने उभारले साम्राज्य
मुस्तफा याला चार चुलत भाऊ आहेत. त्यांच्या मदतीने त्याने ५० स्क्वेअर फूटाच्या किचनमधून बंगलुरुत आपले स्टार्ट सुरु केले. आधी त्याने फ्रेश इडली आणि डोसा बॅटर विकायला सुरु केले. ताजे बॅटर शहरातील लोकांना उपलब्ध करण्याचा त्याचा व्यवसाय चांगला सुरु झाला.
नंतर त्याने रेडी टू इट फूडच्या क्षेत्रात इडली-डोसा बॅटर, बटाटा, पनीर, कर्ड, चटणी सांभार, रेडी मिक्स आणि फिल्टर कॉफीची विक्री सुरु केली.
Leave a Reply