• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..

August 25, 2026 by admin Leave a Comment


बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनांनी रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. शेवटी एका खाजगी नर्सच्या मदतीने रस्त्यावर या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.

बालाजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे यांच्या शेजारी पिसे परिवार राहतो. या परिवारातील महिलेला आज सकाळी सहा वाजता अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. त्या महिलेचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता घरात कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत होता.

हा प्रकार पाहताच योगेश सौभागे तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी स्टाफ नर्सला रस्त्यावर महिलेची प्रसूती होत असल्याची माहिती देत मदतीची विनंती केली. मात्र, “रुग्णालयात कोणीही नाही, डॉक्टर नाहीत, मी एकटी आहे, त्यामुळे मला बाहेर येता येणार नाही,” असे सांगून स्टाफ नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचे सौभागे यांनी म्हटले. परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने योगेश सौभागे यांनी पुन्हा विनंती करत, “महिलेचे अर्धे बाळ आत आणि अर्धे बाहेर आहे. आम्हाला काय करावे हे कळत नाही, तुम्ही तातडीने चला,” अशी विनंती केली.

मात्र, तरीही मदत करण्यास नकार मिळाल्याचा आरोप होत आहे. यानंतर सौभागे यांनी प्रसंगावधान राखत एका खासगी रुग्णालयातील स्टाफ नर्सची मदत घेतली. सौभागे परिवारातील महिलांच्या सहकार्याने महिलेची रस्त्यावरच यशस्वी प्रसूती करण्यात आली. त्यानंतर महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in